ठाणेदाराच्या लेखनिकासह एकास लाच मागितल्या प्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:54 IST2020-03-14T06:53:47+5:302020-03-14T06:54:55+5:30
राजेश झिने याला सोबत घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी साडेसात लाख रुपये लाचेची मागणी केली.

ठाणेदाराच्या लेखनिकासह एकास लाच मागितल्या प्रकरणी अटक
खामगाव : शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर यांचे लेखनिक शिवशंकर सखाराम वायाळ यांच्यासह एकास अडीच लाख रुपये लाच मागितल्या प्रकरणी अकोला लाच लुचपत विभागाने शुक्रवारी रात्री 10.30 वाजता अटक केली.
राजेश झिने याला सोबत घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी साडेसात लाख रुपये लाचेची मागणी केली. मागणी केलेली राशीची रक्कम अडीच लाख रुपये राजेश जिल्हे यांच्यामार्फत घेण्याचे सांगितले. तसा करारनामा ही करून घेतला. खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन शिवशंकर वायाळ व राजेश झिने या दोघांनी संबंधित व्यक्तीला अडीच लाख रुपयांची मागणी केली . याप्रकरणी तक्रारीवरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपी विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदयानुसार सह कलम 385, 120, ब भादविप्रमाणे गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.