तिवरी येथे बनावट दारू कारखाना उद्‌ध्वस्त एकास अटक; एक्साईजच्या पथकाने केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 08:47 PM2021-08-05T20:47:15+5:302021-08-05T20:48:14+5:30

Action taken by Excise Squad : गोपनीय माहितीच्या आधारे एक्साईजच्या पथकाने छापा टाकून येथून एकाला अटक केली.

One arrested for demolishing fake liquor factory at Tiwari; Action taken by Excise Squad | तिवरी येथे बनावट दारू कारखाना उद्‌ध्वस्त एकास अटक; एक्साईजच्या पथकाने केली कारवाई

तिवरी येथे बनावट दारू कारखाना उद्‌ध्वस्त एकास अटक; एक्साईजच्या पथकाने केली कारवाई

Next
ठळक मुद्देअगदी हुबेहूब दिसेल अशा पद्धतीने बनावट दारूच्या बॉटल्स तयार केल्या जात होत्या. ही दारू राजरोसपणे बाहेर विक्रीला पाठविण्यात येत होती.

यवतमाळ : ग्रामीण भागात दारूचे गाळप करून हातभट्टीची विक्री केली जाते. दिग्रस तालुक्यातील तिवरी येथे मात्र याही पुढे जात चक्क बनावट दारू तयार करून त्याला बॉटलिंग व लेबलिंग करून दारू कारखानाच चालविला जात होता. गोपनीय माहितीच्या आधारे एक्साईजच्या पथकाने छापा टाकून येथून एकाला अटक केली.

देशी-विदेशी प्रकारच्या मद्याच्या विविध बॉटल, त्यावर लागणारे सील, स्टीकर्स याचा वापर करून घरातच दारू तयार केली जात होती. अगदी हुबेहूब दिसेल अशा पद्धतीने बनावट दारूच्या बॉटल्स तयार केल्या जात होत्या. ही दारू राजरोसपणे बाहेर विक्रीला पाठविण्यात येत होती. एक्साईजच्या पथकाने गोपनीय माहिती काढून छापा घालत देवानंद प्रेमसिंग राठोड (रा. तिवरी) याला अटक केली. त्याच्या जवळून विविध प्रकारच्या दारूचे लेबल, बॉटलिंग करण्यासाठी वापरली जाणारी मशीन, बनावट दारू, रिकाम्या शिश्या असे साहित्य जप्त केले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक प्रमोद खरात, भरारी पथकाचे निरीक्षक अनंत खांदवे, दुय्यम निरीक्षक दीपक तसरे, राजेश तायकर, अविनाश पेंदोर, महेंद्र रामटेके, अजीस पठाण, निखिल दहेल, बळिराम मेश्राम, चंद्रशेखर चिद्दरवार यांनी केली.

Web Title: One arrested for demolishing fake liquor factory at Tiwari; Action taken by Excise Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.