आत्महत्येप्रकरणी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 02:33 AM2020-09-03T02:33:00+5:302020-09-03T02:33:09+5:30
तिची ओळख याच ठिकाणी कदमशी झाली तो त्यांच्या कंपनीला जेवण पुरविण्याचे काम करायचा. त्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिला बोटीवर काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून ८ लाख उकळले. मात्र तिला काम मिळालेच नाही.
मुंबई : नोकरीचे आमिष दाखवत महिलेकडून लाखो रुपये उकळत तिची फसवणूक करण्यात आली. या तणावात तिने आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर समतानगर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली, तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
दिनेश कदम (४०) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. कांदिवली पूर्वच्या सिद्धिविनायक इमारतीत वृद्ध आईसोबत राहणाऱ्या शोभा आचारी नामक महिलेने ४ आॅगस्ट, २०२० रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. कोरोना काळात तिने कॉल सेंटरमधील नोकरी गमावल्याने ती कामाच्या शोधात होती.
तिची ओळख याच ठिकाणी कदमशी झाली तो त्यांच्या कंपनीला जेवण पुरविण्याचे काम करायचा. त्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिला बोटीवर काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून ८ लाख उकळले. मात्र तिला काम मिळालेच नाही.
आर्थिक परिस्थिती खालावल्याने तिच्यावर भाडेतत्त्वावर घर घेण्याची वेळ आली. त्यातच फसवणूक झाल्याच्या तणावात तिने आयुष्य संपविले. याप्रकरणी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी कदमचा गाशा गुंडाळला, तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे.