३० हजारांची लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 11:59 PM2019-10-04T23:59:59+5:302019-10-05T00:00:13+5:30

पालघर तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून प्रशांत मेहेर आणि त्याच्या सहकाऱ्याला ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली.

one Arrested for taking bribe of Rs 30 thousand | ३० हजारांची लाच घेताना अटक

३० हजारांची लाच घेताना अटक

Next

पालघर : पालघर तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून प्रशांत मेहेर आणि त्याच्या सहकाऱ्याला ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली.
कूळ वहिवाटीप्रमाणे दाखल दाव्याच्या निकालाची प्रत मिळविण्यासाठी अव्वल कारकून मेहेर यांनी तक्रारदाराकडे ६० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांनी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक के. हेगाजे व पो.नि.भारत साळुंखे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने शुक्रवारी सापळा रचण्यात आला. लाचेच्या रकमेपैकी ३० हजारांचा पहिला हप्ता घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालीत त्यांना अटक केली. या प्रकरणात सहभागी असलेल्या त्याच्या कार्यालयातील सहकारी हसमुख राऊत यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

Web Title: one Arrested for taking bribe of Rs 30 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.