जुन्या हवेलीत गुप्तधनाचा शोध घेताना एकाला अटक, तीन जण पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 08:26 PM2020-06-08T20:26:24+5:302020-06-08T20:26:57+5:30

धामक गावात प्रशांतकुमार लूनावत यांची दीडशे वर्षांपूर्वींची जुनी हवेली आहे. येथे रविवारी रात्री दोनच्या सुमारास शेजाºयांना काही तरी खोदण्याचा  आवाज आला. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सदर  माहिती तळेगाव दशासरचे ठाणेदार अशोक कांबळे यांना दिली.

One arrested while searching for hidden treasure in old mansion, three pass | जुन्या हवेलीत गुप्तधनाचा शोध घेताना एकाला अटक, तीन जण पसार

जुन्या हवेलीत गुप्तधनाचा शोध घेताना एकाला अटक, तीन जण पसार

Next

अमरावती - दीडशे वर्षांपूर्वींच्या जुन्या हवेलीत रात्री दोनच्या सुमारास गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला. याप्रकरणी, चालक असलेल्या आरोपीस अटक केली, तर तिघे पसार झाले. तालुक्यातील धामक येथे रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना उघडकीस आली. 

राजेश रेखे (४५, रा. कृष्णापूर, ता. चांदूरबाजार) असे अटक आरोपीने नाव आहे. धामक गावात प्रशांतकुमार लूनावत यांची दीडशे वर्षांपूर्वींची जुनी हवेली आहे. येथे रविवारी रात्री दोनच्या सुमारास शेजाºयांना काही तरी खोदण्याचा  आवाज आला. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सदर  माहिती तळेगाव दशासरचे ठाणेदार अशोक कांबळे यांना दिली.

ठाणेदार घटनास्थळावर पोहोचेपर्यंत गुप्तधन काढण्यासाठी चालक राजेश रेखे हा पांढºया रंगाची एमएच २७ बीई २३३९ हे चारचाकी वाहन घेऊन घटनास्थळी आला. ग्रामस्थाने सदर चालकाला घेराव घातला. त्यावेळी या हवेलीत तीन जण गुप्तधन शोधत असल्याचे चालकाने पोलीस व ग्रामस्थांना सांगितले. पोलिसांनी हवेलीत प्रवेश केला असता तेथे हळदीकुंकू, कापूर, दिवा, लाल कपडा, २१ निंबू असे पूजेचे साहित्य आढळले. दोन बाय तीन असा खड्डा आरोपींनी खोदला होता.

दरम्यान पोलीस आल्याची माहिती मिळताच येथील तीनही आरोपी पसार झाले. प्रकरणी जयदीप महेंद्र काकडे यांच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी चालक राजेश रेखे याला अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता जामीन मिळाला. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनात वसंत राठोड व अमोल हरमकर करीत आहे. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा २०१३ मधील कलम ३, भादंविचे कलम १८८, २६९, ३४ व साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या ३, ४, ५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

धामक येथील एका जुन्या वाड्यात गुप्तधन शोधण्यासाठी काही लोक आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनास्थळाहून चारचाकी वाहन जप्त केले. चालकाला अटक केली.
- अशोक कांबळे, 
ठाणेदार, तळेगाव दशासर

Web Title: One arrested while searching for hidden treasure in old mansion, three pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.