सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला गुन्ह्यात अडकवण्याचा कट व्यावसायिकावर उलटला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 07:26 PM2019-05-18T19:26:02+5:302019-05-18T19:27:21+5:30
खोट्या नोटांच्या तस्करी प्रकरणी झाली अटक
मुंबई - सूड घेण्याच्या भावनेतून तिसऱ्यालाच अडकवण्यासाठी गुजरातच्या व्यावसायिकाने दिलेल्या बनावट नोटा त्याच्या स्वतःच्याच अंगलट आली आहे. बनावट नोटांची बाजारात तस्करी केल्याच्या गुन्ह्यात एका व्यावसायिकासह वांद्रे पोलिसांनी एका २८ वर्षीय मॉडेलला ही अटक केली आहे. राहुल बोराडे (२९) असे या आरोपीचे नाव आहे. मॉडेलच्या चौकशीत तिला ते पैसे राहुलने शरीरसंबध ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राहुलच्या शोध सुरू केला. मोबाईल लोकशननुसार राहुल हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्याला गुजरातहून अटक केली. राहुलच्या चौकशीत त्याने मध्यस्थी महिलेशी झालेल्या वादातून तिला धडा शिकवण्यासाठी तरुणीजवळ बनावट नोटा दिल्याची कबूली दिली. हे पैसे तरुणी मध्यस्थी महिलेला देईल, असा राहुलचा समज होता. मात्र तरुणीने तसे न करता ते पैसे स्वतःच्या खात्यावर जमा केल्याने हे प्रकरण बाहेर आले. या प्रकरणी पोलिसांनी मॉडेलसह राहुलला अटक केली आहे. तसेच राहुलने हे बनावट पैसे कुठून आणले याची चौकशी वांद्रे पोलीस करत आहेत.
गुजरात येथील अहमदाबाद परिसरात व्यवसाय असलेला राहुल महिन्यातून एकदा मुंबईत कामानिमित्त येत असे. स्त्रीलंपट असलेला राहुल मुंबईत आला की महिलांवर अफाट पैसे उधळायचा. यातूनच त्याची ओळख एका महिलेशी झाली होती. राहुल मुंबईत आला की तो त्या मध्यस्थी महिलेला फोन करून शरीर संबधांसाठी तरुणींची मागणी करायचा. त्यानुसार मध्यस्थी महिला राहुलकडे तरुणींना जाण्यास सांगायची. मात्र, एका व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे मध्यस्थी महिलेला त्याला धडा शिकवायचा होता. दरम्यान एप्रिल महिन्यात राहुल मुंबईत आला होता. यावेळी त्याने त्या मध्यस्थी महिलेशी संपर्क साधून शरीर संबधाची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मध्यस्थी महिलेने एका मॉडेलला राहुल थांबला असलेल्या सांताक्रूझमधील पंचतारांकीत हॉटेलात पाठवले. तरुणीला निघताना राहुलने ८४ हजार रुपये दिले. ते पैसे तरुणीने तिच्या एटीएम शाखेतून तिच्या खात्यावर वळवले. दुसऱ्यादिवशी एटीएमचे पैसे बँकेत जमा करण्यात आल्यानंतर तपासणीत बँकेतील कर्मचाऱ्यांना २ हजाराच्या ४२ नोटा बनावट असल्याचे आढळून आले. हे पैसे ज्या एटीएममधून जमा करण्यात आले होते. तेथील सीसीटिव्ही फूटेज तपासले असता ते एका तरुणीने वांद्रे येथील बँकेच्या एटीएममध्ये पैसे जमा केल्याने निष्पन्न झाल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटिव्ही फूटेजच्या मदतीने पैसे जमा करणाऱ्या मॉडेलला अटक केली.
मॉडेलच्या चौकशीत तिला ते पैसे राहुलने शरीरसंबध ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राहुलच्या शोध सुरू केला. मोबाईल लोकशननुसार राहुल हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्याला गुजरातहून अटक केली. राहुलच्या चौकशीत त्याने मध्यस्थी महिलेशी झालेल्या वादातून तिला धडा शिकवण्यासाठी तरुणीजवळ बनावट नोटा दिल्याची कबूली दिली. हे पैसे तरुणी मध्यस्थी महिलेला देईल, असा राहुलचा समज होता. मात्र तरुणीने तसे न करता ते पैसे स्वतःच्या खात्यावर जमा केल्याने हे प्रकरण बाहेर आले. या प्रकरणी पोलिसांनी मॉडेलसह राहुलला अटक केली आहे. तसेच राहुलने हे बनावट पैसे कुठून आणले याची चौकशी वांद्रे पोलीस करत आहेत.