सोनसाखळी खेचून पळणाऱ्या एकास पकडले, दुसरा सटकला; पोलिस सतर्क

By अजित मांडके | Published: February 27, 2023 02:06 PM2023-02-27T14:06:49+5:302023-02-27T14:07:16+5:30

महिलेला दिले ढकलून, एक जण पळून जाण्यात यशस्वी

One caught the runner pulling the gold chain, the other escaped; Police alert | सोनसाखळी खेचून पळणाऱ्या एकास पकडले, दुसरा सटकला; पोलिस सतर्क

सोनसाखळी खेचून पळणाऱ्या एकास पकडले, दुसरा सटकला; पोलिस सतर्क

googlenewsNext

ठाणे : ठाण्यात आजही सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसला नसल्याने त्याचे परिणाम आता आणखी भयंकर दिसू लागले आहेत. गळ्यातील सोनसाखळी खेचणाऱ्या चोरांना महिलेने विरोध केल्याने चोरांनी त्या महिलेले पदपथावर ढकलून दिले. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास मारण्याची धमकी चोरांनी महिलेला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र सोनसाखळी खेचल्यानंतर पळून जाणाऱ्या एका सोनसाखळी चोरास पोलिस आणि नागरिकांनी पकडले असून दुसरा चोर पळून जाण्यास यशस्वी झाला. हा प्रकार रविवारी दुपारी ठाण्यातील कॅडबरी कंपनी बस थांब्याजवळ घडला. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
         
रविवारी सकाळी वर्तकनगर येथील लक्ष्मीचिरागनगरमध्ये राहणारी एक ५२ वर्षांची महिला नेहमीप्रमाणे घरकामासाठी गेली. दुपारी कामावरुन घरी पायी जात असताना, कॅडबरी कंपनी बस थांब्याजवळ अचानक तिच्या समोर दुचाकीवरुन दोघेजण आले. त्यातील एकजण दुचाकीवरुन उतरला. त्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. महिलेने विरोध करताच चोराने महिलेला हत्याराची भीती दाखवत तिला पदपथावर ढकलून दिले. याबाबत तक्रार केल्यास मारण्याची देखील महिलेला धमकी दिली. या प्रकारानंतर महिलेने आरडाओरडा केल्याने पोलिस आणि नागरिकांनी दुचाकीवरुन पळणाऱ्या एका चोरास पकडले. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये त्याला दुखापत झाली असून त्याचे वय १८ आहे. तसेच तो ठाण्यातील मानपाडा परिसरात राहतो. त्याचा दुसरा सहकारी मात्र पळून जाण्यास यशस्वी झाला. या प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
 

Web Title: One caught the runner pulling the gold chain, the other escaped; Police alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.