भोसरीत भरधाव टेम्पोच्या धडकेने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:32 IST2019-09-04T18:30:55+5:302019-09-04T18:32:11+5:30
भरधाव वेगाने टेम्पो चालवून अपघात होण्यास कारणीभूत ठरल्याने चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरीत भरधाव टेम्पोच्या धडकेने एकाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने मुलाचा मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसीत शुक्रवारी (दि. २७) सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित राजू पाटील, असे अपघातातमृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रोहित याची आई रेखा राजू पाटील (रा. खंडेवस्ती, एमआयडीसी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी रेखा यांचा मुलगा रोहित याला शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास टेम्पोने धडक दिली. यात रोहित याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने टेम्पो चालवून अपघात होण्यास कारणीभूत ठरल्याने टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.