रेल्वे प्रशासनाकडून तब्बत सहा तास उपचार न मिळाल्यानं एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 05:09 PM2018-10-15T17:09:44+5:302018-10-15T17:10:41+5:30
शेवटी या व्यक्तीचा मृतदेह लोकलच्या गर्दीतून घेऊन जाण्यात आल्याने रेल्वे प्रसाशनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठाणे - दिवा तळोजा रेल्वे स्थानकादरम्यान कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूस रेल्वे प्रसाशन जबाबदार असल्याची चर्चा सुरु आहे. कारण कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत जखमी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात तब्ब्ल सहा तास तशीच पडून होती. रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिकेची सोय देखील नसल्याने इतका विलंब झाला. उपचारासाठी वेळेत जखमी व्यक्ती न पोहचल्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. शेवटी या व्यक्तीचा मृतदेह लोकलच्या गर्दीतून घेऊन जाण्यात आल्याने रेल्वे प्रसाशनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई हायकोर्टाने प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिका नियमित ठेवण्याचे रेल्वे प्रशासनास आदेश दिले आहेत. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीस योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत.