Breaking : मुलुंडमध्ये लिफ्ट दुर्घटनेत एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 02:58 PM2020-02-06T14:58:00+5:302020-02-06T15:00:21+5:30
लिफ्टच्या दुरावस्थेसंदर्भात वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी विकासकाकडे तक्रार केली होती.
मुंबई - मुलुंड पूर्वेकडील रिचा टॉवर या इमारतीत झालेल्या लिफ्ट दुर्घटनेमध्ये तीन जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली तर लिफ्टच्या वरच्या भागात अडकलेल्या संजय यादव या लिफ्ट टेक्निशियनचा लिफ्ट आणि भिंतीमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबई - मुलुंडमध्ये लिफ्ट दुर्घटनेत एकाचा मृत्यू https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/
— Lokmat (@MiLOKMAT) February 6, 2020
सकाळी अकराच्या दरम्यान लिफ्टच्या दुरुस्तीसाठी इमारतीचे दोन रहिवासी आणि लिफ्टचा एक टेक्निशियन तेराव्या माळ्यावर असलेल्या या लिफ्टच्या दुरुस्तीचे काम करत होते. एक कर्मचारी हा लिफ्टच्या वरच्या भागात काम करत होता त्यावेळी अचानक लिफ्ट सुरू झाली आणि वरील कर्मचारी हा लिफ्ट आणि भिंतीच्या पॅसेजमध्ये अडकला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्ना नंतर लिफ्ट मध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले तर लिफ्ट आणि भिंतीमध्ये अडकलेल्या सुपरवायझर चा मृतदेह देखील बाहेर काढण्यात आला. लिफ्टच्या दुरावस्थेसंदर्भात वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी विकासकाकडे तक्रार केली होती. परंतु, तरीदेखील विकासकाने याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता ही घटना घडल्याचं स्थानिकांचा आरोप आहे.