उल्हासनगरात ट्रकखाली सापडून जागीच एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 18:55 IST2018-12-31T18:54:25+5:302018-12-31T18:55:35+5:30
कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर आज सायंकाळी 6 वाजता एकाचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला असून मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगरात ट्रकखाली सापडून जागीच एकाचा मृत्यू
उल्हासनगर - नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र लगभग सुरू असताना कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर आज सायंकाळी 6 वाजता एकाचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला असून मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-3, कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे 100 फुटी रुंदीकरण झाले आहे. मात्र, काही दुकानदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने रस्त्याची पुनर्बांधणी रखडली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक इसम (एमएच 05, डीव्ही 2657) क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरून सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान जात असताना भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकी वाहनाला अनिल-अशोक चित्रपटगृहासमोर जोरदार धडक दिली. धडकेत इसम ट्रकखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मध्यवर्ती पोलीस घटनेच्या ठिकाणी पोहचले असून मयत इसमाची चौकशी करीत आहेत.