अक्सा समुद्रात बुडून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 06:43 PM2019-10-29T18:43:44+5:302019-10-29T18:45:33+5:30
मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते असून अधिक चौकशी सुरू आहे.
मुंबई - मालाडच्या अक्सा बीच समुद्रात पोहायला उतरलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. तर दोघांना वाचविण्यात आले आहे. मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते असून अधिक चौकशी सुरू आहे.
मालाडमध्ये मालवणी येथे अक्सा समुद्र किनाऱ्यावर बुडालेल्या तीन मुलांपैकी दोघांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आलं आहे. मात्र, या दुर्घटनेत हर्ष गौड (१५) या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनेकजण अक्सा बीचवर फिरण्यासाठी येत असतात. मंगळवारी दुपारी हर्ष गौड (१५), सत्यम यादव (१५), धिरज गुप्ता (१३) हे तिघे दुपारी १ वाजताच्या सुमारास अक्सा बिचवर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्यात खेळत असताना त्यांना समुद्राच्या खोलीचा अंदाज आला नाही. खवळलेल्या समुद्राने त्यांना आत खेचले. वेळीच जीवरक्षकांची नजर या तीन बुडणाऱ्या मुलांवर पडल्याने त्यांनी धाव घेतली. जीवरक्षकांनी स्वत: चा जीव धोक्यात घालून तिघांना बाहेर काढले. मात्र, हर्ष बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला जवळील एमएस हमला रुग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.