खारघर शहरातील पांडवकडा धबधब्यावर एक जण बुडाला; दोघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 04:21 PM2021-06-23T16:21:26+5:302021-06-23T16:26:51+5:30

Drowning case : मृत  मौसम रामबहादुर घर्ती (18 ) हा गोवंडी याठिकाणी वास्तव्यास आहे.

One drowned at Pandavakada waterfall in Kharghar city; two were rescued | खारघर शहरातील पांडवकडा धबधब्यावर एक जण बुडाला; दोघांना वाचविण्यात यश

खारघर शहरातील पांडवकडा धबधब्यावर एक जण बुडाला; दोघांना वाचविण्यात यश

googlenewsNext
ठळक मुद्देमौसम रामबहादुर घरती (18) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पनवेल :खारघर शहरातील पांडवकडा धबधब्यावर मानखुर्द गोवंडी येथील विद्यार्थी पावसाळी सहल साजरी करण्यासाठी आलेल्या तिघांपैकी एकाच बुडून मृत्यू झाला आहे. मौसम रामबहादुर घरती (18) असे मृत तरुणाचे नाव आहे.
         

मंगळवारी दि.22 रोजी गौरव लोखंडे, अखीप खान, सुरज यादव, मौसम घरती, राहील खान असे पांडवकडा येथे काल सायंकाळी 3 च्या  सुमारास पांडवकडा याठिकाणी आले होते.त्यात गौरव लोखंडे व राहिल खान तसेच मौसम घरती यांनी येथील डोहामध्ये उड्या मारल्या यामधून मौसम घरती वर आलाच नाही.मौसम घरती हा वर आला नाही तेव्हा त्याच्या मित्रांनी  नवी मुंबई कंट्रोल ला कळविले. फायर ब्रिगेड व खारघर पोलिस यांनी पाण्यात गळ टाकून तसेच पथकाच्या द्वारे शोध घेण्यास सुरुवात केली.मात्र रात्रभर मृतदेह ताब्यात आले नाही. बुधवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांनी सदर डोहातील खडका खाली अडकलेले प्रेत बाहेर काढले. मृत  मौसम रामबहादुर घर्ती (18 ) हा गोवंडी याठिकाणी वास्तव्यास आहे.
   

खारघर पोलिस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी ह्यांनी वेळोवेळी पर्यटकाना पांडवकडा तसेच शहरातील इतर पर्यटन ठिकाणी न येण्याचे अवाहन केले होते.मात्र डोंगरातून चोर पायवाटेने पर्यटक धबधब्यावर पोहचत आहेत. तरी पुन्हा वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी खारघर येथील धोकादायक ठिकाणी न येण्याचे अवाहन पर्यटकांना केले आहे.

Web Title: One drowned at Pandavakada waterfall in Kharghar city; two were rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.