समलैगिंक संबंधातून एकाचा खून, ७ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 07:03 PM2022-04-16T19:03:16+5:302022-04-16T19:03:23+5:30

One killed in homosexual relationship, 7 arrested : एका ४७ वर्षीय व्यक्तीचा समलैंंगिक संबंधातून सात मित्रांनी खून केल्याची घटना १६ एप्रिल रोजी उघडीकीस आली आहे.

One killed in homosexual relationship, 7 arrested | समलैगिंक संबंधातून एकाचा खून, ७ जणांना अटक

समलैगिंक संबंधातून एकाचा खून, ७ जणांना अटक

Next

बुलडाणा: मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील रहिवासी व औरंगाबाद जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे कक्षसेवक म्हणून कार्यरत असलेल्या एका ४७ वर्षीय व्यक्तीचा समलैंंगिक संबंधातून सात मित्रांनी खून केल्याची घटना १६ एप्रिल रोजी उघडीकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी सातही जणांना अटक केली. विशेष म्हणजे समलैंगिक संबंधांचे छायाचित्रण करून मृत व्यक्तीस पैशासाठी त्यांनी ब्लॅकमेल केल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव श्रीराम पांडुरंग शेळके (४७, रा. धामणगाव बढे) असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी आनंद कुणंद गवई (१९, रा. सावित्रीबाईफुले नगर), शाश्वत रमेश खंडायता (१९, रा. बजरंगनगर), आदेश सुनील राठोड (रा. क्रीडा संकूल परिसर), चेतन गुलाबराव वावरे (२०, रा. वावरे ले आऊट), संतोष रमेश शर्मा (२२, संभाजी नगर), दीक्षांत नवघरे (रा. जुना गाव), कुंदन राम बेंडवाल (२६, रा. रामदेवनगर) या सात जणांना अटक केली आहे.

मृत श्रीराम पांडुरंग शेळके हा २९ मार्च २०२२ रोजी बुलडाण्यातील मलकापूर रोडवरील बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीजवळ एका शेतात गंभीर जखमी तथा बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्यास प्रथम बुलडाणा येथे खासगी रुग्णालय व नंतर अैारंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा ३० मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र मृताच्या मोबाईलचा सीडीआर तपासल्यानंतर आनंद कुणंद गवई याच्याशी श्रीराम शेळकेचे नियमित बोलणे होत असल्याचे समोर आले. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यानंतर श्रीराम शेळकेशी समलैंगिक संबंध असल्याचे कबूल करत संपूर्ण घटनाक्रम उघड केला. त्यानंतर पोलिसांनी १५ एप्रिल रोजी या प्रकरणातील उपरोक्त उर्वरित सहा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात खून, अनैसर्गिक संभोगासह, ब्लॅकमेल करणे तथा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश लोधी हे करत आहेत.

Web Title: One killed in homosexual relationship, 7 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.