झारखंडमध्ये मतदानावेळी झालेल्या गोळीबारात एक ठार; पोलिसांनी ईव्हीएम नेले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 12:48 PM2019-12-07T12:48:41+5:302019-12-07T12:49:12+5:30

मतदारांना जबरदस्तीने मतदान करण्यापासून रोखण्य़ात येत होते. यानंतर तेथे दगडफेक करण्यात आली.

One killed in polls in Jharkhand; Police took EVMs | झारखंडमध्ये मतदानावेळी झालेल्या गोळीबारात एक ठार; पोलिसांनी ईव्हीएम नेले

झारखंडमध्ये मतदानावेळी झालेल्या गोळीबारात एक ठार; पोलिसांनी ईव्हीएम नेले

Next

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात हिंसक घटना घडली आहे. गुमला जिल्ह्यातील सिसईमध्ये मतदान केंद्रावर मतदारांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यानंतर तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याने पोलिसांनी ईव्हीएम ताब्यात घेतले आहे. 


मतदारांना जबरदस्तीने मतदान करण्यापासून रोखण्य़ात येत होते. यानंतर तेथे दगडफेक करण्यात आली. निवडणूक आयोगाने या प्रकरणी अहवाल मागविला असून अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. नागरिकांनी पत्रकारावरही हल्ला केला आहे. पोलिसांनी मतदान केंद्राच्या आसपासचा परिसर सील केला असून सीआरपीएफची तुकडी गावामध्ये रवाना करण्यात आली आहे. 

या गोळीबारात काही जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाला गंभीर जखमीला रांचीला हलविण्यात आले आहे. गुमलाचे पोलिस प्रमुखांनी सांगितले की, मतदारांकडून मतदान केंद्रावर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच त्याच्यावर पोलिसांनी गोळीबारही केला आहे. मतदारांना रोखण्यात येत असल्याचा आरोप करत सुरक्षा पथकावर दगडफेक करण्यात आली. यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे मतदान अधिकारी दुसऱ्या खोलीत लपले आहेत. 


पोलिसांनी झाडलेली गोळी लागल्याने जिलानी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. या ठिकाणी दगडफेक सुरूच असून तणावाचे वातवरण आहे. हॉस्पिटलमध्येही मोठ्या संख्येने लोक पोहोचले आहेत. 

Web Title: One killed in polls in Jharkhand; Police took EVMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.