बंदुकीचा धाक दाखवून एक लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 10:26 PM2022-09-19T22:26:05+5:302022-09-19T22:26:22+5:30
यापूर्वी देखील दरेगाव शिवारात बंदूक व शस्त्राचा धाक दाखवून कारखानदाराला लुटण्याचा प्रकार घडला होता.
मालेगाव (नाशिक) :- येथील सोयगाव कमानी जवळील कलंत्री गॅस एजन्सीच्या संचालकांना दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवून एक लाखाची रोकड लुटून नेली.
सोमवारी दि(१९) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या लुटीच्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी छावणी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होते. येथील मालेगाव -सटाणा रोडवरील कलंत्री गॅस एजन्सीमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयतांनी बंदूक व धारदार शास्त्राचा धाक दाखवला. यावेळी संचालकांना दमदाटी करून गल्ल्यातील एक लाख रुपयाची रोकड चोरून नेली.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती पोलीसही दाखल झाले होते. सामाजिक कार्यकर्ते एजन्सीचे सतीश कलंत्री यांनी यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली होती. यापूर्वी देखील दरेगाव शिवारात बंदूक व शस्त्राचा धाक दाखवून कारखानदाराला लुटण्याचा प्रकार घडला होता. वारंवार असे प्रकार घडत असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धती विषयी शंका उपस्थित केली जात आहे