बॅनरवर नाव न टाकल्याच्या वादातून एकाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 09:53 PM2018-07-31T21:53:09+5:302018-07-31T21:53:42+5:30

शुल्लक कारणांवरून बोरिवली शिंपोली परिसरात झाला खून 

One of the murders was made by the name of not being named on the banner | बॅनरवर नाव न टाकल्याच्या वादातून एकाची हत्या 

बॅनरवर नाव न टाकल्याच्या वादातून एकाची हत्या 

googlenewsNext

मुंबई - बोरिवलीत पूर्ववैमन्यस्यातून अंबादास लक्ष्मण शिंदे याची त्याच्या तीन साथीदारांनी हत्या केली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. बॅनरवर नाव न टाकल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. .

बोरिवलीच्या शिंपोली येथील झोपडपट्टीत शिंदे हा रहात असून तो रिक्षा ड्राईव्हर आहे. मात्र, अनेक सराईत गुन्ह्यातही त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याला पूर्वी तडीपार केले होते. कालांतराने शिंदे पुन्हा परिसरात रिक्षा चालवू लागला होता. त्याच परिसरात राहणाऱ्या रिक्षा चालकांची बोरिवलीत युनियन आहे. या युनियनतर्फे काही दिवसांपूर्वी पूजा आणि कार्यक्रम भरवण्यात आले होते. त्यावेळी छापण्यात आलेल्या बॅनरवर शेतीयार या भावकीतील सदस्यांची नावे टाकण्यात आली नव्हती. त्यामागे शिंदेचा हात असल्याचा संशय शेतीयार यांना होता. दरम्यान सोमवारी रात्री शिंदे आणि शेतियार भाऊबंद दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी याच विषयांवरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर शेतीयार यांनी शिंदे याच्यावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनास पाठवून पोलिसांनी शेतीयार भावांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलिस शेतीयार भावांचा शोध घेत आहे.

 

Web Title: One of the murders was made by the name of not being named on the banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.