महिलेकडून आठ लाख रुपये उकळणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 07:43 PM2019-05-06T19:43:47+5:302019-05-06T19:44:43+5:30
कॅनडातील वर्क पर्मनन्ट परमिट रेसिडेन्सीचे काम करण्यासाठी स्वत:कडील आठ लाख भरल्याचे त्यांना सांगितले.
पिंपरी : कॅनडातील वर्क परमिट व पर्मनन्ट रेसिडेन्सीचे काम करुन देण्याचा बहाणा करीत महिलेकडून आठ लाख रुपये उकळणारया एकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. जतिन नरेंद्रसिंग ठाकुर (वय ३४, रा. सिल्वरनेट सोसायटी, नरेगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साधना हरीसराय सिंग (वय ३२, रा. द्वारकाविश्व सोसायटी, सेक्टर नं. ०७, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी जतिन ठाकुर याने साधना सिंग यांचा विश्वास संपादन करुन त्यांचे कॅनडातील वर्क पर्मनन्ट परमिट रेसिडेन्सीचे काम करण्यासाठी स्वत:कडील आठ लाख भरल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर हे पैसे मानव यास देणे आहे असे सांगून ठाकुर याने मानव गायधने आणि इतरांच्या खात्यात सिंग यांना आठ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतरही सिंग यांचे कॅनडातील वर्क परमिट व परमनन्टरेसिडेन्सीचे काम त्याने केले नाही. दरम्यान, यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.