महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:00 PM2019-07-25T15:00:53+5:302019-07-25T15:02:28+5:30

झेब्रा कॉसिंगवर उभ्या असलेल्या दुचाकीवर सतर्क पुणे अँपद्वारे कारवाई करत असताना महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे़.

one person arrested due to wrong behaviour with women Traffic Police | महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्याला अटक

महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्याला अटक

Next

पुणे : झेब्रा कॉसिंगवर उभ्या असलेल्या दुचाकीवर सतर्क पुणे अँपद्वारे कारवाई करत असताना महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे़. तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या व अश्लिल  शिवीगाळ करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़. 
सागर वसंतराव जांभुळकर (वय २७, रा़ अशोक स्मृती सोसायटी, कासारवडली रोड, ठाणे) असे अटक केलेल्यांचे नाव आहे़. तर अश्लिल शिवीगाळ करणाºया अमृता देशमुख (रा़ लोणीकाळभोर) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ .ही घटना बॅनर्जी चौकात बुधवारी सायंकाळी पावणे सहा वाजता घडली़. 
याप्रकरणी वाहतूक शाखेच्या समर्थ वाहतूक विभागातील ३३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़. ही महिला कर्मचारी व पोलीस हवालदार बॅनर्जी चौकात कार्यरत होते़. सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास सागर जांभुळकर व अमृता देशमुख हे मोटारसायकलवरुन चौकात आले व सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहिले़. त्यावेळी या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईलवर सतर्क पुणे या अँपवरुन कारवाई करीत होते़. त्याचा जांभुळकर यांना राग आला़ मागे बसलेल्या देशमुख हिने अश्लिल शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली़. त्यांच्याशी झटापट करीत मोबाईल हिसकावून घेऊन तो फेकून दिला़. जांभुळकर याने शिवीगाळ करुन सरकारी कर्तव्य बजाविण्यास अडथळा आणला़ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन जांभुळकर याला अटक केली आहे़. 


 

Web Title: one person arrested due to wrong behaviour with women Traffic Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.