रावेत येथे भरधाव वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:11 IST2020-05-23T13:10:07+5:302020-05-23T13:11:20+5:30
मनोज हे ते राहत असलेल्या सोसायटीच्या गेटजवळ सॅनिटायजेशनचे काम करीत होते.

रावेत येथे भरधाव वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू झाला. रावेत येथे गुरुवारी (दि. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
मनोज सर्जेराव कांबळे (वय ४४) असे मयताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी रुपाली मनोज कांबळे (वय ४२, रा. सिल्वर पाम सोसायटी, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक भिकाजी तळेकर (वय ६२, रा. सिल्वर पाम सोसायटी, रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मनोज हे ते राहत असलेल्या सोसायटीच्या गेटजवळ सॅनिटायजेशनचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी याने त्याच्याकडील चारचाकी वाहन भरधाव चालवून मनोज यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. डोके व मानेला मार लागून ते गंभीर जखमी झाले. यात त्यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.