उत्तर प्रदेशात पोलिसांसमोर गोळी झाडून एकाची हत्या; मारेकरी भाजप आमदाराचा भाऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 07:57 AM2020-10-17T07:57:04+5:302020-10-17T07:57:19+5:30
३ उपनिरीक्षक, ६ कॉन्स्टेबल निलंबित, नरेंद्र प्रतापसिंह यांच्यासह त्यांचा भाऊ व २२-२५ अज्ञात लोकांची नावे प्रथमदर्शनी अहवालात नोंदवण्यात आली आहेत.
बल्लिया/लखनौै (उत्तर प्रदेश) : बल्लियात गुरुवारी प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित असलेल्या बैठकीत झालेल्या भांडणानंतर तेथेच जय प्रकाश यांची (४६) गोळी घालून हत्या करणारा भाजपचा स्थानिक नेता धीरेंद्र सिंह याच्यासह पाच जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
दुर्जनपूर खेड्यात स्वयंसहायता गटांच्या सदस्यांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी रेशन दुकानांच्या वाटपासाठीच्या या बैठकीचे कामकाज थांबवल्यानंतर जय प्रकाश यांची हत्या झाली. भाजपचे स्थानिक आमदार सुरेंद्र सिंह यांचा धीरेंद्र सिंह हा भाऊ आहे. सुरेंद्र सिंह यांनी भावाला पाठीशी घालताना म्हटले की, ‘जर त्याने स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली नसती, तर त्याच्या कुटुंबातील डझनभर सदस्य आणि सहकारी ठार मारले गेले असते.’ पोलीस प्रशासनाने आमच्या बाजूने प्रथमदर्शनी ‘हलगर्जीपणा’ झाल्याचे मान्य करून रेवती पोलीस ठाण्याचे तीन उपनिरीक्षक आणि सहा कॉन्स्टेबल्सना निलंबित केले आहे.
आरोपींना पकडण्यासाठी धाडसत्र
नरेंद्र प्रतापसिंह यांच्यासह त्यांचा भाऊ व २२-२५ अज्ञात लोकांची नावे प्रथमदर्शनी अहवालात नोंदवण्यात आली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी छापे घातले जात आहेत, असे जिल्हा पोलीस अधिकाºयाने सांगितले. मुख्य आरोपी फरार आहे. घटनास्थळी दहा पोलीस कर्मचारी होते. ते गुन्हेगारांना वाचवत होते व आम्हाला मारहाण करीत होते. धीरेंद्र प्रताप सिंह हा गोळीबारानंतर पळून गेला व पोलिसांनी त्याला पकडले; परंतु त्यांनी त्याला जवळच्या बंधाºयावर नेऊन सोडून दिले, असे जय प्रकाश पालचे भाऊ तेज प्रताप पाल यांनी शुक्रवारी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.