प्रेयसीचा भाऊ बनून तिच्या पतीची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 11:15 AM2022-08-05T11:15:29+5:302022-08-05T11:18:02+5:30
Crime News : पोलिसांनी आरोपीला पकडलं आणि इशारा देऊन सोडलं. चौकशी दरम्यान समजलं की, तरूण महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता.
UP Crime News : उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक प्रियकर प्रेयसीचा भाऊ बनून तिच्या पतीविरोधात तक्रार करण्यासाठी एसपीकडे पोहोचला. पती तिला मारहाण करत असल्याची तक्रार त्याने केली. पोलिसांनी या तरूणावर संशय आला. त्यानंतर त्यांनी चौकशी केली तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपीला पकडलं आणि इशारा देऊन सोडलं. चौकशी दरम्यान समजलं की, तरूण महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रेयसीचं लग्न जुळवण्यातही याच तरूणाचा हात होता. पण आता जेव्हा त्याचं काम होत नाहीये तेव्हा तो तिचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. एसपी कौस्तुभ कुमार यांनी कथित प्रियकराला सांगितलं की, जर त्याने पुन्हा विवाहित महिलेच्या आयुष्यात लुडबूड केली तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल.
ही घटना गुरूवारची आहे. आरोप आहे की, तरूण त्याची अर्ज घेऊन एसपीसमोर आला होता आणि त्याने सांगितलं होतं की, सासरी त्याच्या बहिणीवर अत्याचार होत आहेत. त्याच्या बहिणीला सासरचे लोक मारहाण करत आहेत. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. एसपी डॉ. कौस्तुभ यांनी गंभीरतेने याची चौकशी सुरू केली. यानंतर तरूणाने हॉस्पिटलमध्ये भरती महिलेसोबत त्याचं नातं कधी चुलत बहीण तर कधी भाची असं सांगितलं. यावर पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी सांगितलं की, महिलेचं लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं होतं. या घटनेबाबत महिलेच्या पतीला सांगण्यात आलं तेव्हा तो ढसाढसा रडायला लागला होता. पती म्हणाला की, या तरूणानेच त्याचं लग्न जुळवलं होतं. आता आमच्या संसारात लुडबूड करत आहे. त्याने मला बदनाम केलं. लोक चर्चा करत आहेत की, माझ्या पत्नीचे दोन-दोन पती आहेत. मी अडकलो आहे.