एक चोर अन् 25 कोटींची चोरी; एकट्यानेच रचला प्लॅन, पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 09:00 PM2023-09-29T21:00:36+5:302023-09-29T21:01:26+5:30

दिल्लीतील सोन्याच्या दुकानातून 25 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

one thief and theft of 25 crores; made the plan alone, police arrested accused | एक चोर अन् 25 कोटींची चोरी; एकट्यानेच रचला प्लॅन, पोलिसांनी घेतले ताब्यात

एक चोर अन् 25 कोटींची चोरी; एकट्यानेच रचला प्लॅन, पोलिसांनी घेतले ताब्यात

googlenewsNext

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील एका सोन्याच्या दुकानात झालेल्या 25 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणीपोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एवढ्या मोठ्या चोरीचा कट एकाच व्यक्तीने रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. चोरी करण्यापूर्वी त्याने दुकानाची रेकी केली आणि नंतर 25 कोटींचे दागिने घेऊन बिलासपूरला गाठले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश श्रीवास असे या चोरट्याचे नाव आहे. तो आधी एकटा बसने दिल्लीला आला आणि रविवारी 24 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता शेजारील इमारतीतून ज्वेलरी शोरुममध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी 7 वाजता त्याच मार्गाने बाहेर पडला.

एकाच चोरट्याने 25 कोटींची चोरी केली 
यानंतर लोकेश रात्री 8.40 वाजता दिल्लीतील कश्मिरे गेट बसस्थानकावर आणि बसने गावी गेला. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर लोकेशचा सुगावा लागला. 

छत्तीसगडमधून तीन आरोपींना अटक
चोरीकेल्यानंतर लोकेश छत्तीसगडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिल्ली पोलिसांनी छत्तीसगड पोलिसांना माहिती दिली. छत्तीसगड पोलिसांनी मुख्य आरोपी लोकेश श्रीवास याला दुर्ग येथील स्मृतीनगर पोलीस स्टेशन परिसरातून अटक केली. लोकेशशिवाय शिवा चंद्रवंशी याच्यासह तिघांना अटक करण्यात आली. 

18 किलो सोने आणि 12.50 लाखांची रोकड जप्त 
पोलिसांनी आरोपीच्या अड्ड्यावर छापा टाकला तेव्हा पोलिसही चक्रावले. आरोपींनी बेडवर सोने आणि पैसे ठेवले होते. त्यांच्याकडून दिल्लीतील शोरुममधून चोरलेले 18 किलो सोने आणि 12.50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी लोकेशचा दुसरा सहकारी शिवा चंद्रवंशी याला कावर्धा येथून दागिन्यांसह 28 लाख रुपयांच्या मालासह अटक केली आहे. पोलीस आरोपींना अटक करून दिल्लीत आणत आहेत.

Web Title: one thief and theft of 25 crores; made the plan alone, police arrested accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.