अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी एकास तीन वर्षाची सक्तमजूरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 08:51 PM2019-02-21T20:51:49+5:302019-02-21T20:55:03+5:30

याप्रकरणाची सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी होवून आरोपी विशाल कैलास तेलंग यास न्यायालयाने साडेतीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे.

One-three-year sanction for rape in minor girl | अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी एकास तीन वर्षाची सक्तमजूरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी एकास तीन वर्षाची सक्तमजूरी

Next
ठळक मुद्दे हंस कॉटन जिन्ससमोरून सैय्यद वसीम (वय २२) हा त्याच्या शाहदाब व सादीक या दोन मित्रांसोबत १८ एप्रिल २०१६ दुपारी १ वाजता जात होता. पोलिसांनी साक्षीदारांचे बयाण नोंदवून आरोपीला तात्काळ अटक केली

खामगाव - तेरा वर्षीय मुलीवर बलात्कारप्रकरणी २४ वर्षीय युवकाला तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा खामगावन्यायालयाने गुरुवारी सुनावली आहे. 
शहरातील हंस कॉटन जिन्ससमोरून सैय्यद वसीम (वय २२) हा त्याच्या शाहदाब व सादीक या दोन मित्रांसोबत १८ एप्रिल २०१६ दुपारी १ वाजता जात होता. त्यांना एक २४ वर्षीय मुलगा १३ वर्षीय मुलीला गोडावूनच्या दिशेने घेवून जातांना दिसला. मुलांनी त्याच्यावर पाळत ठेवली. तेव्हा तो त्या मुलीसोबत अतिप्रसंग करीत होता. मुलांनी आरडाओरड केली असता त्याने पळ काढला. याप्रकरणी सैय्यद वसीम (वय २२) रा. खामगाव याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून विशाल कैलास तेलंग (वय २४) याच्याविरुद्ध अ.प.क्रमांक १२९/१६ कलम ३७६, (२) (आय) सह कलम ४ बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ अन्वये गुन्ह दाखल करण्यात आला. पोलिसांनी साक्षीदारांचे बयाण नोंदवून आरोपीला तात्काळ अटक केली. हे प्रकरण पोलिसांनी खामगाव न्यायालयात दाखल केले. याप्रकरणाची सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी होवून आरोपी विशाल कैलास तेलंग यास न्यायालयाने साडेतीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. राजेश्वरी आळशी यांनी बाजू मांडली.

Web Title: One-three-year sanction for rape in minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.