एकतर्फी प्रेमातून मुलीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 09:11 PM2018-09-18T21:11:08+5:302018-09-18T21:11:55+5:30

One-way love threatens to attack acid | एकतर्फी प्रेमातून मुलीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

एकतर्फी प्रेमातून मुलीला अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

Next

अमरावती - अल्पवयीन मुलीला अंगावर अ‍ॅसिडहल्ला करण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. शोएब (रा.हातीपुरा) असे एकतर्फी प्रेम करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी महाविद्यालयातून घरी जात असताना आरोपी पाठलाग करीत होता. आरोपीने तिला रस्त्यात गाठून प्रेमाची विनवणी केली. तिने नकार दिला असता, आरोपीने अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. तसेच मुलीच्या अंगाला स्पर्श केला. त्यामुळे पीडित मुलगी घाबरून गेली. तिने घर गाठून हा प्रकार कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर ती कुटुंबीयांसह गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यासाठी गेली. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आरोपी शोएबविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ३५४, ३५४(ड), ५०६, सहकलम ८,१२, पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत करीत आहे.

Web Title: One-way love threatens to attack acid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.