धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:08 PM2018-10-02T15:08:45+5:302018-10-02T15:08:57+5:30
अकोला - धनादेश अनादरप्रकरणी एका आरोपीस आठवे प्रश्रमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी एक वर्षांची शिक्षा व ६५ हजार रुपये दंड ठोठावला.हे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले.
अकोला - धनादेश अनादरप्रकरणी एका आरोपीस आठवे प्रश्रमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी एक वर्षांची शिक्षा व ६५ हजार रुपये दंड ठोठावला.हे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. यापैकी ६० हजार रुपये बँकेला व ५ हजार रुपये सरकारला नुकसान भरपाई देण्याचेही आदेशात नमुद आहे.
डाबकी रोडवरील ज्ञानेश्वर नगरातील रहिवासी अमोल अशोक येळणे यांनी अकोला अर्बन बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्ज परतफेडीसाठी अमोल येळणे याने अकोला जनता कमर्शियल बँकेचा ३९ हजार ५३१ रुपयांचा धनादेश ७ फेब्रुवारी २००७ ला दिला होता. हा धनादेश वटविण्यासाठी बँकेत लावण्यात आला. परंतु, हा धनादेश अनादर झाला. त्यामूळे अकोला अर्बण बँकेने त्यांना नोटीस पाठवून पैसे भरण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आरोपीने त्यास विरोध केला. त्यानंतर अकोला अर्बन बँकेतर्फे न्यायालयात याचिका दाखल केली. आठवे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. बी. रेडकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अमोल येळणे यास दोषी ठरवित एक वर्षांची शिक्षा व ६५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. ६५ हजार रुपयांपैकी ६० हजार रुपये बँकेला नुकसान भरपाई म्हणून आणि ५ हजार रुपये सरकारला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी बँकेकडून अॅड. अजय गुप्ता, अॅड. धिरज शुक्ला यांनी कामकाज पाहीले.