अवघ्या 10 रुपयांना विकत होते किलो-किलो कांदा; पोलिसांनी थेट तुरुंगातच धाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 09:33 AM2019-12-26T09:33:13+5:302019-12-26T09:33:30+5:30
देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या वाढलेल्या दराने लोकांना रडविले आहे. कुठे 80 रुपये किलो तर कुठे 130-140 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. तर मध्यंतरीच्या काळात कांदा तब्बल 200 रुपयांना विकला जात होता.
ग्वाल्हेर : स्वस्तात कांदा विकणे दोन तरुणांना भारी पडले आहे. त्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे. प्रकरण मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरचे आहे. महत्वाचे म्हणजे या दोन तरुणांचा स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्याचा हेतू चांगला होता मात्र त्यांनी उचललेले पाऊल चुकीचे होते.
देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या वाढलेल्या दराने लोकांना रडविले आहे. कुठे 80 रुपये किलो तर कुठे 130-140 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. तर मध्यंतरीच्या काळात कांदा तब्बल 200 रुपयांना विकला जात होता. यामुळे शेतकऱ्यांनी थेट शेतातूनच परिपक्व न झालेला कांदा बाजारात आणला होता. सध्या या कांद्याला 80 ते 100 रुपयांचा दर आहे. यामुळे वैतागलेल्या दोन तरुणांनी लोकांना कमी किंमतीत कांदा उपलब्ध करण्यासाठी 60 हजार रुपयांचा कांदाच चोरला.
एका कांदा व्यापाऱ्याच्या गोदामावर या तरुणांनी डल्ला मारला. येथील लसून आणि कांदा त्यांनी चोरून बाजारात नेला. यामध्ये कांद्याची 50 किलोची 12 पोती आणि लसणीची दोन पोती होती. त्यांनी बाजारात 10 ते 20 रुपयांना किलोने त्यांनी विकायला सुरूवात केली. याची माहिती मिळताच लोकांनी तोबा गर्दी केली. आता 100 रुपयांचा कांदा बाजारात 10 रुपयांना मिळतोय ही खबर पोलिसांना नाही मिळाली तर नवलच. त्यांनी थेट विक्रीचे ठिकाण गाठले. पण तोपर्यंत कांदा हातोहात खपून हे तरूण निघूनही गेले होते.
अखेर पोलिसांनी चौकशी करत या दोन तरुणांना शोधून ताब्यात घेतले. यावेळी चौकशीत त्यांनी कांदा चोरला आणि कमी किंमतीत विकल्याचे कबुल केले आहे. यावेळी त्यांनी यामागचे कारणही सांगितले.