आॅनलाइन बूट खरेदी पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:19 AM2018-12-26T02:19:49+5:302018-12-26T02:20:13+5:30

आॅनलाइन बूट खरेदी कन्फर्म झाल्याचा मस्ेोज न आल्याने संबंधित वेबसाइटच्या कस्टमर केअरला बँक खात्याची माहिती न पुरवणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.

 An online boot purchase fraud | आॅनलाइन बूट खरेदी पडली महागात

आॅनलाइन बूट खरेदी पडली महागात

Next

पुणे : आॅनलाइन बूट खरेदी कन्फर्म झाल्याचा मस्ेोज न आल्याने संबंधित वेबसाइटच्या कस्टमर केअरला बँक खात्याची माहिती न पुरवणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.
याबाबत सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने मोबाइलवरून क्लब फॅक्टरी ही वेबसाइट सर्च केली होती. यावर तिला बूट आवडले होते.
खरेदी करण्यासाठी डेबिट कार्डद्वारे १ हजार ४४९ रुपये दिले. यानंतर आॅर्डर कन्फर्म केल्याचा मेसेज न आल्याने तिने कस्टमर केअरकडे विचारणा केली. तेव्हा तिला डेबिट कार्डद्वारे पेमेंट केलेले पैसे परत करण्यात येतील, असे सांगत तिच्या व तिच्या आईच्या बँकेची सर्व माहिती घेतली. यानंतर दोघींच्याही खात्यातून ७७ हजार २३१ रुपये काढून घेण्यात आले. २३ डिसेंबर रोजी हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. भामरे करीत आहेत.

Web Title:  An online boot purchase fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.