ऑनलाइन धर्मांतर; अलिबागमधून अटक, मुंब्रा पाेलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 10:57 AM2023-06-12T10:57:33+5:302023-06-12T10:57:59+5:30

‘फाेर्ट नाइट’ या गेमिंग ॲप्लिकेशनवरून ओळख झाली.

online conversion; Arrested from Alibag, action taken by Mumbra Police | ऑनलाइन धर्मांतर; अलिबागमधून अटक, मुंब्रा पाेलिसांनी केली कारवाई

ऑनलाइन धर्मांतर; अलिबागमधून अटक, मुंब्रा पाेलिसांनी केली कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्रा: उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाइन धर्मांतरप्रकरणी  गुन्हा दाखल असलेला बद्दो ऊर्फ शाहनवाज  खान (२३) याला रविवारी मुंब्रा पोलिसांनी अलिबाग येथून एका काॅटेजमधून अटक केली.  ताे मुंब्रा येथील देवरीपाड्यातील घरातून काही दिवसांपासून पसार झाला हाेता. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक अजय कुंभार आणि त्यांचे पथक खान याच्या मागावर हाेते. मोबाइलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तो  वरळी पोलिस ठाण्याच्या  हद्दीत असल्याचे पाेलिसांना कळले. त्याआधारे  वरळी पोलिस यांच्या मदतीने शोध घेतला असता तो  अलिबाग येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिस पथक अलिबागला गेले. 

उत्तर प्रदेशातील गाजियाबादच्या कवीनगर पोलिस ठाण्यात धर्मांतराच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याजवळ स्मार्टफाेन व आयपॅड कॉम्प्युटर आहे. त्याचा व्हाॅट्सअप नंबर व इन्स्टाग्रामवर अकाउंट असल्याचे पोलिस म्हणाले.

पीडित मुलाशी कशी केली ओळख?

  • पीडित मुलाशी त्याची २०२१च्या सुरुवातीला ‘फाेर्ट नाइट’ या गेमिंग ॲप्लिकेशनवरून ओळख झाली. त्यानंतर ‘डिसकाॅड’च्या सुविधेमार्फत ते एकमेकांशी बाेलू लागले. 
  • त्यानंतर त्यांच्यात मैत्री हाेऊन त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेऊन बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर गेम खेळणे काही दिवस बंद केले हाेते. २०२१च्या डिसेंबरअखेर ते ‘वाॅलाेरंट’ हा गेम खेळू लागले. या गेममध्ये ते आइस-बाॅक्स या टार्गेटच्या ठिकाणी पोहाेचले. त्यानंतर पहिल्यांदा दाेघांमध्ये धर्मांतर विषयावर बोलणे झाले. 
  • त्यावेळी झाकीर नाईक याने केलेल्या स्पीचवर चर्चा झाली. आरोपी हा घरातून कॉम्प्युटरवरून गेम खेळत होता, असे चाैकशीत उघड झाल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Web Title: online conversion; Arrested from Alibag, action taken by Mumbra Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.