'हॅलो, Make my trip..!' कस्टमर केअरच्या नावाखाली वसूल केले 82 लाख; आठ बँक खाती गोठवली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 07:09 PM2022-02-17T19:09:05+5:302022-02-17T19:09:35+5:30

Online Fraud : चौकशीदरम्यान आरोपी अभिषेक कुमारने कबूल केले की, त्याने फ्लिपकार्ट, मेक माय ट्रिप, एअरलाइन्स इत्यादींच्या कस्टमर केअर सर्व्हिसच्या नावाने आपला फोन नंबर गुगल अॅड्सवर टाकला होता.

online fraud in jharkhand 8 accounts 82 lakhs customer support | 'हॅलो, Make my trip..!' कस्टमर केअरच्या नावाखाली वसूल केले 82 लाख; आठ बँक खाती गोठवली

'हॅलो, Make my trip..!' कस्टमर केअरच्या नावाखाली वसूल केले 82 लाख; आठ बँक खाती गोठवली

Next

नवी दिल्ली : कस्टमर केअर सर्व्हिसद्वारे सेवा देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी झारखंडमधील (Jharkhand) दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, 22 वर्षीय अभिषेक कुमार आणि राजू अन्सारी यांना झारखंडमधील दुमका येथून अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार अभिषेक कुमार विविध कस्टमर केअर वेबसाइटच्या नावाखाली त्याचा फोन नंबर इंटरनेटवर टाकत होता. 

गेल्या सहा महिन्यांपासून तो अशाप्रकारे फसवूक करण्याचे काम करत होता आणि त्याचा साथीदार अन्सारी हा आपल्या पश्चिम बंगालमधील आसनसोल गावातून बँक खात्यांची व्यवस्था करत होता, असे पोलिसांनी सांगितले. ज्या आठ बँक खात्यांमध्ये 82 लाख रुपये जमा करण्यात आले होते, ती बँक खाती गोठवण्यात आली आहेत. अनेकांना फसवून ही रक्कम जमा करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. तसेच, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पीडिताला 4.78 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आणि त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

तक्रारीत असे म्हटले आहे की, पीडित व्यक्ती पैसे परत मिळवण्यासाठी 7 जानेवारी रोजी 'मेक माय ट्रिप' वेबसाइटचा कस्टमर केअर नंबर शोधत होता. त्यावेळी त्या व्यक्तीला आरोपीचा नंबर मिळाला. आरोपीने पीडित व्यक्तीला फोनवर बोलत असताना स्वत:ची ओळख 'मेक माय ट्रिप' कंपनीचा कर्मचारी म्हणून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पीडित व्यक्तीने आरोपीने फोनवर पाठवलेला फॉर्म भरला आणि 'AnyDesk अॅप' इन्स्टॉल केले. यानंतर पीडितेच्या एचडीएफसी बँक खात्यातून 4,78,278  रुपये काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

चौकशीदरम्यान आरोपी अभिषेक कुमारने कबूल केले की, त्याने फ्लिपकार्ट, मेक माय ट्रिप, एअरलाइन्स इत्यादींच्या कस्टमर केअर सर्व्हिसच्या नावाने आपला फोन नंबर गुगल अॅड्सवर टाकला होता. पीडितांचे कॉल आल्यानंतर तो त्यांना फॉर्म भरण्यास आणि Any Desk अॅप इन्स्टॉल करण्यास सांगत असे. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तो अॅपद्वारे पीडितेच्या फोन स्क्रीनवर नजर ठेवायचा आणि दुसऱ्या अॅपद्वारे बँकेचा एसएमएस वाचायचा. बँकेचे डिटेल्स जाणून घेतल्यानंतर तो पीडितेच्या खात्यातून पैसे काढत असे, असे पोलीस उपायुक्त (शाहदरा) आर. सत्यसुंदरम यांनी सांगितले. 

Web Title: online fraud in jharkhand 8 accounts 82 lakhs customer support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.