FASTag वर रिफंड मिळवण्याच्या नादात गमावले 1.20 लाख रुपये; तुमच्याकडून पण 'ही' चूक होतेय का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 05:14 PM2022-12-08T17:14:06+5:302022-12-08T17:14:39+5:30

online fraud : पैसे परत करण्याच्या बहाण्याने हॅकर्सनी व्यापाऱ्याचा मोबाईल हॅक करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले.

online fraud trying for fastag refund businessman loses | FASTag वर रिफंड मिळवण्याच्या नादात गमावले 1.20 लाख रुपये; तुमच्याकडून पण 'ही' चूक होतेय का? 

FASTag वर रिफंड मिळवण्याच्या नादात गमावले 1.20 लाख रुपये; तुमच्याकडून पण 'ही' चूक होतेय का? 

Next

मुंबई : गेल्या काही वर्षांत भारतात ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. फसवणूक करणाऱ्या अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत, ज्या तुम्हाला काही समजायच्या आधी तुमची फसवणूक करू शकतात. तुमचा डेटा तसेच तुमच्या बँक खात्यातून पैशांची चोरी करू शकतात. दरम्यान, फास्टॅग (FASTag) वरून रिफंड मिळवण्याच्या नादात मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या खात्यातून 1.20 लाख रुपये गमावले. हे प्रकरणा सुद्धा ऑनलाइन फसवणूक केल्याचे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याने FASTag खात्यावर चुकून जास्त पैसे पाठवले होते. पैसे परत मिळवण्यासाठी व्यापाऱ्याने इंटरनेटवरून कंपनीच्या कस्टमर केअर नंबर घेऊन त्यावर चर्चा केली. दरम्यान, तो नंबर कस्टमर केअरचा नसून हॅकर्स म्हणजेच फसवणूक करणाऱ्यांचा होता. पैसे परत करण्याच्या बहाण्याने हॅकर्सनी व्यापाऱ्याचा मोबाईल हॅक करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतले.

मुंबईच्या एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत इलेक्ट्रिक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्याने सांगितले की, त्यांना गुजरातला जायचे होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कारच्या FASTag खात्यात पैसे टाकावे लागले. त्यांनी चुकून FASTag खात्यात 1,500 ऐवजी 15,000 रुपये टाकले. जास्तीचे पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी इंटरनेटवर FASTag चे कस्टमर केअरचा नंबर शोधला. यावेळी त्यांना कस्टमर केअरचा नंबर म्हणून हॅकर्सचा नंबर मिळाला. 

या हॅकर्सच्या नंबरवर कॉल केल्यावर फोन उचलणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख FASTag चा कर्मचारी म्हणून दिली आणि पैसे परत करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. हॅकर्सने FASTag युजर्सला म्हणजेच व्यापाऱ्याला आपल्या फोनवर एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अॅप डाऊनलोड केल्यानंतर व्यापाऱ्याला परतावा मिळण्यासाठी काही रक्कम देण्यास सांगण्यात आले. हे केल्यानंतर व्यापाऱ्याच्या खात्यातून पैसे निघू लागले. हॅकर्सनी व्यापाऱ्याच्या खात्यातून 1.20 लाख रुपये काढले.

तुम्ही व्हा सावध!
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता आता सर्वांनीच सावध राहण्याची गरज आहे. जर कधीही कोणत्याही कंपनीचा किंवा अॅपचा ग्राहक सेवा क्रमांक आवश्यक असेल तर तो त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरूनच घ्यावा. तुम्ही जिथून नंबर घेत आहात, त्या वेबसाइटची पूर्ण तपासणी करा. दरम्यान, बऱ्याचदा असे घडत आहे की, फसवणूक करणारे अनेकदा समान नावाने वेबसाइट तयार करतात आणि लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. याशिवाय, अज्ञात व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. तसेच, अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर कोणतेही अॅप डाउनलोड करू नका.

Web Title: online fraud trying for fastag refund businessman loses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.