बँक मॅनेजर, सॉफ्टवेअर इंजिनिअर चालवायचे ऑनलाईन हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 12:32 PM2020-06-30T12:32:13+5:302020-06-30T13:05:34+5:30
एका वेबसाईटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न
पुणे/बाणेर : एका एस्कॉर्ट वेबसाईटच्या माध्यमातून बाणेर येथील रो हाऊसमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश चतु:श्रृंगी पोलिसांनी केला असून हा हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय चक्क एक बँक मॅनेजर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर चालवित असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बुकिंगसाठी वापरण्यात येणारे ११ मोबाईल, ४ लॅपटॉप, १ आयपॅड व कार जप्त करण्यात आले आहेत.
रविकांत बालेश्वर पासवान (वय ३४, रा. सुसगाव, मुळ बिहार), दीपक जयप्रकाश शर्मा (वय ३६, रा. अंबर अपार्टमेंट, बालेवाडी, मुळे ओरिसा), सुरेश प्रल्हाद रणवीर (वय २५, रा. बाणेर), रो हाऊस मालक नाकसेन रामदास गजघाटे (वय ५२, रा. बावधन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी माहिती दिली. रविकांत पासवान हा पुणे जिल्ह्यातील मुरुम येथील बँक ऑफ बडोदा शाखेचा बँक मॅनेजर आहे. दीपक शर्मा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. बाणेर येथील ओयो हॉटेल रो हाऊस मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी २३ जून रोजी छापा घालून दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर ते एका वेबसाईटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवित असल्याचे आढळून आले. गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून त्यांचा हा धंदा सुरु असल्याचे समजते. यामध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. जोया रेहान खान (रा़भोपाळ) ही फरार असून तिचा शोध सुरु आहे.