Online Love, Fraud: 'रोमँटिक धोका'! एक भेट, चॅटिंग अन् मुलीने दिले २ कोटी, पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 05:45 PM2023-03-12T17:45:19+5:302023-03-12T17:45:53+5:30

तिने मैत्रिणीला सगळी कहाणी सांगितली आणि पुढे भलतंच घडलं

Online Love Chatting Dating and Cheating Fraud with Girl when truth revealed everyone was shocked see what happened next | Online Love, Fraud: 'रोमँटिक धोका'! एक भेट, चॅटिंग अन् मुलीने दिले २ कोटी, पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं...

Online Love, Fraud: 'रोमँटिक धोका'! एक भेट, चॅटिंग अन् मुलीने दिले २ कोटी, पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं...

googlenewsNext

Online Love, Fraud:  हल्ली सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. इंटरनेटवरून हल्ली दोन मिनिटांत फोटो, व्हिडीओ पाठवता येतात. व्हिडीओ कॉलवरून थेट माणसाची ख्यालीखुशाली पाहता येते. इतकंच नव्हे तर पैशाची देवाणघेवाणही करता येते. पण त्यामुळे हल्ली ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही बऱ्याच वाढल्या आहेत. अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत ऑनलाइन फसवणूक याविषयावर एक चर्चासत्र झाले. त्यात लोक त्यांची मत मांडत होते आणि अनुभवही सांगत होते. या चर्चेदरम्यान एका तरूणीने तिच्याबरोबर घडलेला किस्सा सांगितला आणि त्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला.

नक्की काय घडला प्रकार?

या प्रकरणात एका तरुणीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. हा सगळा प्रकार ऑनलाइन घडला. ती एका मुलाशी चॅटिंग करू लागली आणि जाळ्यात अडकली. पण नंतर समजलं की तो मुलगा नसून त्या तरूणीचीच मैत्रिण होती. खरे तर हे प्रकरण थोडे जुने आहे. पण या चर्चेनंतर प्रचंड व्हायरल झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण चीनच्या शांघाय शहरातील आहे. यासाठी आरोपी तरुणीने मित्रासोबत प्लॅन करून तिची फसवणूक केली. मिळालेल्या माहितीनुसार, एकदा आरोपीने पीडित मुलीची त्या मित्राशी ओळख करून दिली, त्यानंतर खरा खेळ सुरू झाला.

आरोपी मुलीने त्या मित्राची फसवणूक झालेल्या तरूणीशी न्यूज अँकर म्हणून ओळख करून दिली. आरोपीने स्वतः न्यूज अँकर बनून तरूणीशी ऑनलाइन चॅट सुरू केले आणि नंतर ही प्रक्रिया खूप पुढे गेली. तसेच लग्नासाठी तयार असल्याचे सांगून मैत्रिणीकडून सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आणि मग अचानक चॅटिंग बंद केले. त्यानंतर पीडितेने आरोपी तरुणीला संपूर्ण हकीकत सांगितली.

तपास पुढे गेल्यावर आरोपी मुलीने सर्व काही मान्य केले. वृत्तानुसार, स्थानिक पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी या अतिशय विचित्र ऑनलाइन घोटाळ्याचे प्रकरण सोडवले आहे. या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी आरोपी महिलेला अटकही केली आहे. त्या आरोपी मुलीने पिडीतेची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचेही मान्य केले. त्यामुळे त्या आरोपी मुलीला न्यायालयानेही तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: Online Love Chatting Dating and Cheating Fraud with Girl when truth revealed everyone was shocked see what happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.