केवळ वरिष्ठ, अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार; यंदा पीएसआय ते पीआयची ‘जीटी’ नाही

By जमीर काझी | Published: October 10, 2022 06:50 AM2022-10-10T06:50:07+5:302022-10-10T06:50:43+5:30

गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बदल्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

Only senior, super senior officers will be transferred; This year there is no 'GT' from PSI to PI | केवळ वरिष्ठ, अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार; यंदा पीएसआय ते पीआयची ‘जीटी’ नाही

केवळ वरिष्ठ, अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार; यंदा पीएसआय ते पीआयची ‘जीटी’ नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : गेल्या  पाच  महिन्यांपासून रखडलेल्या पोलीस दलातील बढत्या, बदल्या येत्या काही दिवसांत होणार आहेत. मात्र,  वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ  अधिकाऱ्यांच्या  बदल्या होणार आहेत.  उपनिरीक्षक,  एपीआय, पीआय या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा सर्वसाधारण बदल्या (जीटी) यंदा केल्या जाणार नाहीत. निम्मे आर्थिक वर्ष संपल्याने त्यांची काैटुंबिक व कार्यालयीन गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बढतीबरोबरच  बदली आणि निवडणूक आयोगाच्या निकषानुसार परिक्षेत्र व आयुक्तालयांतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत. 

 अधिकारी व अंमलदारांच्या बदल्या दरवर्षी ३१ पर्यंत केल्या जाव्यात,  असे   निर्देश आहेत. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना महामारीमुळे त्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून  दोन वर्षे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये बदल्या केल्या. यावर्षीही  राज्यातील राजकीय अस्थिरता आणि त्यानंतरचे सत्तांतर नाट्य, पावसाळा, गणेशोत्सव, नवरात्रीमुळे पोलिसांच्या बदल्या रखडल्या आहेत. आयपीएस संवर्गातील ज्या पोलीस उपायुक्त, अधीक्षकापासून ते अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांना तेथून हलविण्यात येईल, त्याचप्रमाणे प्रलंबित बढतीही त्वरित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढतीचे आदेश जारी होतील, असे सूत्रांनी सांगितले. 

रिक्वेस्ट ट्रान्सफरही मोजक्याच
पीएसआय ते पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी जे काही अत्यंत गरजू असतील, अशा काही मोजक्याच विनंती बदली (रिक्वेस्ट ट्रान्सफर)  आवश्यकतेनुसार केल्या जाणार आहेत. नवी मुंबई, पुणे, एसआयडी, नागपूर पोलीस आयुक्तांसह  कार्यकाळ पूर्ण झालेल्या सहआयुक्त, आयजी, उपायुक्त तसेच १५ वर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या जातील.

रश्मी शुक्ला यांची ‘घरवापसी’ निश्चित
केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या ज्येष्ठ आयपीएस रश्मी शुक्ला यांनी घरवापसी निश्चित मानली जाते. ‘फोन टॅपिंग’प्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेला त्यांच्याविरुद्धचा क्लोजर रिपोर्ट’ हा त्याचाच एक भाग आहे. त्यांना मुंबईचे आयुक्तपद वगळता अन्य मोठे पद किंवा त्यांच्यासाठी विशेष पदाची निर्मिती होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. 
.. ..

Web Title: Only senior, super senior officers will be transferred; This year there is no 'GT' from PSI to PI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस