नाद खुळा! पोलिसांनीच टाकली ED च्या कार्यालयात धाड; अधिकाऱ्यालाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 09:45 AM2023-12-02T09:45:54+5:302023-12-02T09:52:43+5:30

ईडीच्या उपविभागीय कार्यालयात धाड टाकली आहे.

Open the sound! The police will raid the work of ED madurai, the officer ankit tiwari will also be arrested | नाद खुळा! पोलिसांनीच टाकली ED च्या कार्यालयात धाड; अधिकाऱ्यालाही अटक

नाद खुळा! पोलिसांनीच टाकली ED च्या कार्यालयात धाड; अधिकाऱ्यालाही अटक

मदुरै - तामिळनाडूच्या मदुरै येथील अमंजलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीच्या एका अधिकाऱ्यास २० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. या अधिकाऱ्याने एका सरकारी डॉक्टरशी संबंधित प्रकरणात बेहिशोबी मालमत्तेचा तपास करत होता. अंकित तिवारी असं या ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव असून त्याने डॉक्टराकडे तब्बल १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या अटकेनंतर तामिळनाडूच्या लालचुचपत प्रतिबंधन विभागाच्या पोलिसांनी थेट मदुरै येथील ईडीच्या उपविभागीय कार्यालयात धाड टाकली आहे. आत्तापर्यंत ईडीचे अधिकारी अनेकांच्या घरी धाड टाकत होते, मात्र आता ईडीच्या कार्यालयात धाड टाकल्याने जोरदार चर्चा होत आहे.

ईडी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचार प्रकरणी तपास करण्यासाठी येथील दक्षता आणि भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने विभागीय कार्यालयावर पोलिसांसह धाड टाकली. या पथकाने ईडीच्या संबंधित अधिकाऱ्याला अटक केली असून अंकित तिवारी असं त्याचं नाव आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत माहितीही पोलिसांकडून दिली जाईल. अंकित तिवारी एका वेगवाग कारमधून प्रवास करत होता, त्यावेळी, पोलिसांनी पाठलाग करुन त्याला अटक केली. अंकित तिवारीला रंगेहाथ अटक करण्यासाठी भ्रष्ट्राचार निर्मून पथकाने जाळं टाकलं होतं. स्टेट हायवेवरील एक ड्रॉप ऑफ पाईंटवर अंकित तिवारीने संबंधित प्रकरणातील लाचेचा पहिला हफ्ता म्हणजेच २० लाख रुपये घेतले. त्याचवेळी, भ्रष्टाचार निर्मून पथकाने घटनास्थळी रेड मारली अन् ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली.


तामिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ईडी अधिकाऱ्यावर अशाप्रकारे भ्रष्टाचार निर्मून पथकाच्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

विशेष म्हणजे तामिळनाडूतील राज्य सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणां यांच्यात ५ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याचा वाद सुरू असतानाच अशी कारवाई ईडीच्या अधिकाऱ्यावर करण्यात आली आहे. अवैध वाळू उत्खनन प्रकरणात कथित मनी लाँड्रींग प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये, मद्रास उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी नोटीसला स्थगिती दिली आहे. 
 

Web Title: Open the sound! The police will raid the work of ED madurai, the officer ankit tiwari will also be arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.