महिलेच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडले; अपलोड केले अश्लील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 18:02 IST2021-09-02T18:00:56+5:302021-09-02T18:02:51+5:30
Pornographic photos uploaded on Social Media : याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

महिलेच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडले; अपलोड केले अश्लील फोटो
जळगाव : इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईडवर महिलेच्या नावे बनावट खाते तयार करुन त्या प्रोफाईलवर महिलेचा फोटो अपलोड करत या खात्यावर अश्लील फोटो शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
चाळीसगाव शहरातील २७ वर्षीय महिलेच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. ३० ऑगस्ट रोजी रात्री हे अश्लील फोटो या महिलेच्या बनावट खात्यावर पोस्ट करण्यात आले. या महिलेने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अब्रुनुकसान व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.
सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचे होणार व्हिडीओग्राफी; पोलिसांनी दोनदा तपासला मृतदेहhttps://t.co/eEMEdDBX5U
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021
पती पत्नीच्या भांडणात मुलाने घेतला वृद्ध आईचा जीव; गोळीबार करून झाला फरारhttps://t.co/OUX3mp3g9E
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021