ऑपरेशन ब्लेड , झोपेच्या गोळ्यांची मागणी करीत मेडीकल चालकाला मारहाण

By नामदेव भोर | Published: February 28, 2023 06:46 PM2023-02-28T18:46:14+5:302023-02-28T18:46:45+5:30

याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Operation Blade, medical driver assaulted for demanding sleeping pills | ऑपरेशन ब्लेड , झोपेच्या गोळ्यांची मागणी करीत मेडीकल चालकाला मारहाण

ऑपरेशन ब्लेड , झोपेच्या गोळ्यांची मागणी करीत मेडीकल चालकाला मारहाण

googlenewsNext

नामदेव भोर

नाशिक : नाशिकरोड येथील  जुन्या बिटको रुग्णालयाजवळील एका मेडिकल दुकानात सोमवारी (दि.२७) मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या तिघांनी ऑपरेशन ब्लेड आणि झोपेच्या गोळ्यांची मागणी करीत मेडीकलचालकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. संशयितांनी गोळ्या घेण्याचा बहाणा करीत मेडिकल चालकास शिवीगाळ व धक्काबुक्की करून बळजबरीने त्याच्या खिशातील दीड हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे.

शिखरेवाडी आंबा सोसायटी येथे राहणारा चांगदेव रामभाऊ भांगरे हा जुन्या बिटको रुग्णालयाजवळील ए टू झेड मेडिकल मध्ये कामाला असून सोमवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास भांगरे नेहमीप्रमाणे मेडिकल बंद करीत असताना दुचाकीवर आलेल्या तिघा युवकांनी त्यांच्याकडे ऑपरेशन ब्लेड व झोपेच्या गोळ्यांची मागणी केली.त्यावर भांगरे यांनी ब्लेड व गोळ्या नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने तिघांपैकी एक युवक बळजबरीने मेडिकलमध्ये घुसून सर्दीच्या गोळ्या घेण्यासाठी आलेल्या दोघा अनोळखी ग्राहकांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून हुसकावून लावत दुकानाबाहेर त्यांना मारण्यासाठी गेला. यावेळी भांगरे यांनी तात्काळ दुकानाच्या बाहेर येऊन शटर लावून घेतले. त्या युवकांनी भांगरे यांना शिवीगाळ करून मारहाण करत बळजबरीने त्यांच्या खिशातील दीड हजार रुपयांची रक्कम काढून घेत जबरी चोरी केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Operation Blade, medical driver assaulted for demanding sleeping pills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.