अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 06:05 PM2021-01-31T18:05:51+5:302021-01-31T18:06:26+5:30

Drugs Smuggling : पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने म्हाळुंगे पोलीस चाैकीच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) ही कारवाई केली.  

Opium smugglers found in police custody; 22 lakh 87 thousand items confiscated | अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त

अफुच्या बोंडांची तस्करी करणारे सापडले पोलिसांच्या तावडीत; २२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देचिंबळी फाटा येथील हाॅटेल आराध्या व्हेज नाॅनव्हेज व हाॅटेल पंजाबी ढाबा येथेही पोलिसांनी छापा मारून अफुची बोंडे जप्त केली.

पिंपरी : अफुच्या बोंडांच्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे. सापळा रचून एक ट्रक पकडून दोन लाख २३ हजार २०० रुपये किमतीच्या अफुच्या बोंडांसह एकूण २२ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने म्हाळुंगे पोलीस चाैकीच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) ही कारवाई केली.  

जगदीशप्रसाद पुनमाराम बिष्णोई (वय ३२, रा. जोधपूर, राजस्थान), तानाजी बालाजी सातपुते (वय २३), अभिनेश चाईन्सिंघ पाैळ (वय ४७, दोघेही रा. चिंबळी फाटा, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथून अफुची बोंडे (दोडा चुरा भुकटी व कणीदार पावडर) एका ट्रकमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे सापळा लावला. त्यावेळी चाकणकडून भोसरीच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला थाबवून ट्रकचालक आरोपी बिष्णोई याच्याकडे पोलिसांनी चाैकशी करून ट्रकची पाहणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये अफुची बोंडे मिळून आली. त्याचबराेबर चिंबळी फाटा येथील हाॅटेल आराध्या व्हेज नाॅनव्हेज व हाॅटेल पंजाबी ढाबा येथेही पोलिसांनी छापा मारून अफुची बोंडे जप्त केली. या कारवाईत ४२ हजार ४० रुपयांची रोकड, ५ हजार ५२० रुपयांचा गुटखा, दोन लाख २३ हजार २०० रुपये किमतीची १२ किलो ४०० ग्रॅम अफूची बोंडे (दोडा चुरा भुकटी व कणीदार पावडर), २० लाख रुपये किमतीचा ट्रक तसेच १५ हजारांचे तीन मोबाईल फोन, असा एकूण २२ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक नीलेश वाघमारे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी संतोष असवले, अनंत यादव, संदीप गवारी, सुनील शिरसाठ, नितीन लोंढे, महेश बारकुले, दीपक साबळे, भगवंता मुठे, अमोल शिंदे, मारुती करचुंडे, विष्णू भारती, गणेश कारोटे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, मारोतराव जाधव, राजेश कोकाटे, योगेश तिडके, योगिनी कचरे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Opium smugglers found in police custody; 22 lakh 87 thousand items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.