स्मार्ट पोलिसिंगबद्दल राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 08:41 PM2019-02-06T20:41:36+5:302019-02-06T20:47:51+5:30

फिक्की अ‍ॅवार्डसाठी आवाहन

Opportunity for national level award for Smart Polishing | स्मार्ट पोलिसिंगबद्दल राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराची संधी

स्मार्ट पोलिसिंगबद्दल राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराची संधी

ठळक मुद्दे ‘स्मार्ट पोलीसिंग’बद्दल देशस्तरावरील फिक्की अ‍ॅवार्डने गौरविले जाणार आहे. त्यासाठी राज्य पोलीस दलातील प्रत्येक घटक प्रमुखांना या पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पोलीस घटकप्रमुखांनी त्यानुसार विहित नमुन्यामध्ये नामनिर्देशन अर्ज ३१ मार्चपर्यत भरून पाठवावयाचे आहेत. पोलीस मुख्यालयाकडून त्यासंबंधी सर्व घटक प्रमुखांना आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई - आपल्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याबरोबर विविध विधायक उपक्रम राबविणाऱ्या पोलीस आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयांना राष्ट्रीयस्तरावर चमकण्याची संधी प्राप्त झाली आहे. ‘स्मार्ट पोलीसिंग’बद्दल देशस्तरावरील फिक्की अ‍ॅवार्डने गौरविले जाणार आहे. त्यासाठी राज्य पोलीस दलातील प्रत्येक घटक प्रमुखांना या पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवी दिल्लीतील फिक्की सिक्युरीटी या संस्थेतर्फे पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विधायक उपक्रमाबद्दल दरवर्षी देशपातळीवर गौरव केला जातो. त्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेबरोबरच समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या, पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्याची कार्यवाही आणि प्रत्यक्षात त्याचा झालेला परिणाम, याबाबत आढावा घेतला जाणार आहे. फिक्की पुरस्कार, त्याबाबतचे निकष यासंबंधी सविस्तर माहिती याबाबतची माहिती पोलीस दलाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याशिवाय प्रत्येक पोलीस घटक कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाठविण्यात आलेली आहे. पोलीस घटकप्रमुखांनी त्यानुसार विहित नमुन्यामध्ये नामनिर्देशन अर्ज ३१ मार्चपर्यत भरून पाठवावयाचे आहेत. पोलीस मुख्यालयाकडून त्यासंबंधी सर्व घटक प्रमुखांना आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Opportunity for national level award for Smart Polishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.