"अत्यंत भयावह! योगीचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं, हे अत्याचार कधी थांबणार?"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 10:43 AM2021-02-18T10:43:28+5:302021-02-18T10:44:46+5:30
Uttar Pradesh Crime News And Yogi Government : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच राज्यातील महिला सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतात दोन मुलींचे मृतदेह आढळले असून तिसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तीन अल्पवयीन मुली शेतात ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. असोहा पोलीस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेवरून राजकारण तापलं असून अनेकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच राज्यातील महिला सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी असोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुली शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या आहेत. सध्या या प्रकरणात अनेकांची अधिक चौकशी केली जात असून वेगाने तपास करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. मात्र सपाचे नेते सुनील सिंग यादव यांनी या प्रकरणात मुलींवर अत्याचार झाल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याबाबत एक ट्विट देखील केलं आहे. यासोबतच आपचे नेते संजय सिंह यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला असून टीकास्त्र सोडलं आहे. "अत्यंत भयावह... आदित्यनाथजींचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं" असं म्हणत जोरदार टीका केली आहे.
अत्यंत भयावह आदित्यनाथ जी का राज बेटियों के लिये क़ब्रगाह बन गया है, उन्नाव की घटना दिल दहला देने वाली है आख़िर कब रुकेगी ये दरिंदगी? https://t.co/pl6plhSASG
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) February 17, 2021
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अत्यंत भयावह... आदित्यनाथजींचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं आहे, उन्नावची घटना मन हेलावून सोडणारी आहे. हे अत्याचार कधी थांबणार?" असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे. आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद यांनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. "उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील घटना अत्यंत भयावह आहे. दोन दलित मुलींचे मृतदेह सापडले आहेत. एक जखमी आहे. मुलीला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने एम्स दिल्ली येथे आणायला हवे. आम्ही आता कोणत्याही स्थितीत हाथरसची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आमची टीम घटनास्थळी जात आहे. बहिणींच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी कोणतीही तडजोड करणार नाही" असं चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.
उन्नाव केस की एकमात्र गवाह बच्ची का बेहतर इलाज व उसकी सुरक्षा सबसे जरूरी है। बच्ची को तत्काल एयर एंबुलेंस से AIIMS दिल्ली लाया जाए। उत्तरप्रदेश सरकार का अपराधियों को संरक्षण व अपराधियों के मामले में सरकार की कार्यशैली को देश हाथरस कांड में देख चुका है। #Save_Unnao_Ki_Beti
— Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) February 17, 2021
भयंकर! उन्नाव पुन्हा एकदा हादरले, शेतात आढळले 2 मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज
जंगलामध्ये संशयास्पद अवस्थेत तीन मुली आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच मुलींना लगेचच जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूरच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तिन्ही मुली या आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे. गाव आणि रुग्णालय परिसराच्या आसपास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धक्कादायक! शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या अल्पवयीन मुली, परिसरात खळबळhttps://t.co/8FvhyeTU91#crime#crimenews#UttarPradesh#YogiAdityanath#Police
— Lokmat (@MiLOKMAT) February 18, 2021