रहस्य! अनाथ सरस्वतीला ३ बहिणी, शिक्षित असूनही मनोज का करायचा ५ हजारांची नोकरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 02:32 PM2023-06-09T14:32:02+5:302023-06-09T14:33:11+5:30

मनोज साने आणि सरस्वती वैद्य दोघे अनाथाश्रम जायचे. ती त्याला मामा म्हणायची.

Orphan Saraswati has 3 sisters, why did Manoj Sane do a 5000 job despite being educated? | रहस्य! अनाथ सरस्वतीला ३ बहिणी, शिक्षित असूनही मनोज का करायचा ५ हजारांची नोकरी?

रहस्य! अनाथ सरस्वतीला ३ बहिणी, शिक्षित असूनही मनोज का करायचा ५ हजारांची नोकरी?

googlenewsNext

ठाणे - मीरा भाईंदरमध्ये घडलेल्या महिलेच्या क्रूर हत्याकांडानंतर आता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेतील आरोपी मनोज साने याने पोलीस तपासात धक्कादायक खुलासा केला आहे. २००८ पासून त्याची तब्येत बिघडली होती जेव्हा त्याला स्वत:ला HIV पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. अनेक वर्षापूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतर त्याला हॉस्पिटलला दाखल केले होते. तिथे एचआयव्ही संक्रमित सुई अथवा रक्त दिल्यामुळे हे झाले. इतकेच नाही तर मी सरस्वतीची हत्या केली नाही तर तिने आत्महत्या केल्याचा दावा त्याने पोलिसांसमोर केला. 

मनोज सानेला सरस्वती मामा का म्हणायची?
सरस्वती वैद्य अनाथ होती. आता तिच्या ३ बहिणीसमोर आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, सरस्वती ही अहमदनगरच्या जानकीबाई आपटे बालआश्रमात शिकत होती. तिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. सरस्वती मनोजला मामा हाक मारायची असं आश्रम कर्मचारी अनु साळवेने सांगितले. मामा खूप पैसेवाला आहे आणि त्याची कपड्याची मिल आहे असं सरस्वतीने आश्रमात सांगितले होते. 

सरस्वती अनाथ, मग ३ बहिणी कुठून आल्या? 
सरस्वती वैद्य यांच्या हत्येनंतर तिच्या ३ बहिणी पोलीस ठाण्यात पोहचल्या. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. त्यांनी पोलिसांना काय सांगितले हे समोर आले नाही. एका बहिणीसोबत व्यक्तीही होता. तो कोण आहे त्याचा पत्ता नाही. सध्या पोलीस या हत्येचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मनोज साने आणि सरस्वती वैद्य दोघे अनाथाश्रम जायचे. ती त्याला मामा म्हणायची. दोघे सफेद कारने यायचे. सरस्वती स्वत:सोबत आश्रमातील मुलांना जेवण आणि कपडे आणायची. सुरुवातीला ती खूप खुश होती त्यानंतर मागील २ वर्षापासून दु:खी होती. कुणाशी काही बोलायची नाही. ती दु:खी का असायची हे तिने कुणालाही सांगितले नाही. सरस्वती जेव्हा १८ वर्षाची होती तेव्हा आश्रमातून बहिणीकडे गेली होती. 

मनोज रेशन दुकानावर काम करायचा. तेव्हा त्याची भेट सरस्वतीसोबत झाली. मनोजकडे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे सर्टिफिकेट आहे. मग साने इतका शिक्षित होता मग रेशन दुकानावर काम का करायचा असा प्रश्न उभा राहतो. रेशन दुकानावर अवघे ५ हजार रुपये त्याला पगार मिळायचा. त्यात त्याने मीरारोडला भाड्याने फ्लॅट घेतला होता. ज्याचे भाडे ३० हजार रुपये होते. मनोज सानेकडे कार होती. ज्यातून तो सरस्वतीसोबत आश्रमात जायचा. सरस्वती म्हणायची मामा खूप श्रीमंत आहे मग तो रेशन दुकानावर काम का करायचा? याचे उत्तर पोलीस शोधत आहे. 

सरस्वती वैद्य रेशन दुकानावर काम करणाऱ्या मनोजसोबत ३ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायची. डीसीपी जयंत बजबले यांच्यानुसार, महिलेची हत्या ३ जून रोजी रात्री झाली. आरोपीने कटर मशीनने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. ३ दिवसांनी मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे परिसरात वास पसरला त्यानंतर लोकांनी पोलिसांना बोलावले. मनोज मागील काही दिवसांपासून रोज कुत्र्यांना जेवण घालतो याआधी तो असे करत नव्हता असे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मनोज कुकरमध्ये मांसाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून त्याची पेस्ट बनवून कुत्र्याला खायला द्यायचा असं उघड झाले. 

Web Title: Orphan Saraswati has 3 sisters, why did Manoj Sane do a 5000 job despite being educated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.