२०० रुपये मागितल्याच्या रागातून लोखंडी रॉडने मारहाण, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 06:43 PM2021-12-28T18:43:27+5:302021-12-28T18:44:39+5:30
Assaulting Case : याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदानंद नाईक
उल्हासनगर : मजुरीच्या कामाचे राहिलेले २०० रुपये राहुल हटकर यांनी मागितल्याच्या रागातून चुवा नावाच्या इसमाने व त्याच्या साथीदारांच्या लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-२ भैयासाहेब आंबेडकरनगर मध्ये राहुल हटकर राहत असून तो पडेल ते मोलमजुरीचे काम करतो. दोन महिन्या पूर्वी चुवा यांच्याकडे राहुल हटकर यांनी २ हजार रुपयांचे काम केले होते. २ हजारापैकी १८०० रुपये चुवा या ओळखीच्या इसमाने देऊन २०० रुपये बाकी राहिले होते. सोमवारी रात्री ११ वाजता राहुल हटकर खेमानी परिसरातून जात असताना चुवा दिसल्याने, कामाचे बाकी राहिलेल्या २०० रुपयांची मागणी केली. यावेळी पैसे देण्यास नकार देऊन चुवा व त्याच्या साथीदारांने शिवीगाळ व मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने हटकर जखमी झाले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर, पोलीस अधिक तपास करीत आहेत.