पार्टीची झिंग...दारूच्या नशेत व्यावसायिकांकडून तरुणीला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 21:59 IST2023-02-14T21:58:58+5:302023-02-14T21:59:46+5:30
उच्चभ्रू वसाहतीतील घटना, गुन्हा दाखल

पार्टीची झिंग...दारूच्या नशेत व्यावसायिकांकडून तरुणीला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्टी दरम्यान नशा जास्त झाल्याने हॉटेल व्यावसायिकाकडून तरुणीला मारहाण झाल्याची घटना ना म जोशी मार्ग येथील लोढा बेलिसिमो बिल्डींगमध्ये घडली. याप्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीसांनी बिपिन कुमार सिंग विरोधात मंगळवारी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
गोरेगाव परिसरात राहणाऱ्या स्वागता गिरीश शहा (३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांची फ्युचर क्राफ्ट इव्हेंट कंपनी असून त्या कलाकर व अँकर आहे. शहा यांची दहा दिवसांपूर्वी बिपीन कुमार सिंग सोबत ओळख झाली. सिंगने होळी सणानिमत्त बलाला कॅफे येथे ईव्हेंट करायचा असल्याबाबत सांगितले. त्यामुळे त्यांची दोन वेळा भेट झाली. १३ फेब्रुवारी रोजी त्यांनी मित्र विरेन पटेल, विरेन पटेलची मैत्रिण चक्रवती, बिपीन कुमार सिंग यांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर, विरेन पटेल यांच्या ना म जोशी मार्ग येथील अपोलो मिल कम्पाउंड येथील लोढा बेलिसिमो बिल्डींगमध्ये
येथे पहाटे साडे चार वाजेपर्यंत पार्टी केली. सिंगने त्याच्या दोन मित्र व तीन मैत्रीण यांना देखील विरेन याच्या घरी पार्टीसाठी बोलावुन घेतले. पार्टीमध्ये बिपीनकुमार याने नशा केल्यामुळे तो हायपर झाला. पार्टीमध्ये तो सर्वाशी उध्दट्टपणे व आरेरावीच्या भाषेत बोलून गोंधळ घातला.
पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्टी दरम्यान नशा जास्त झाल्याने हॉटेल व्यावसायिकाकडून तरुणीला मारहाण. #CrimeNews#Mumbai#ValentinesDayhttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/CTV6iDGJwz
— Lokmat (@lokmat) February 14, 2023
आरडाओरड करून पार्टीमधील मुलींची छेडछाड करू लागला. त्यामुळे पार्टीमधील सर्वांनी निघुन जाण्यास सांगु लागले. बिपीनकुमार कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानंतर, बिपीनकुमार याला समजविण्याचा प्रयत्न करत असताना, त्याने जबरदस्तीने सोबत नेत कानाखाली मारली. तरुणी खाली कोसळली. कानातुन व नाकातून रक्त आले. त्यावेळी बिपीन कुमार हा तेथुन खाली निघुन गेला. त्यांनी पुन्हा त्याच्यामागे येत मारहाण का केली? याबाबत जाब विचारला. त्याने, हात पकडुन मुरगळला. आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड करताच लोढा बेलिसिमो बिल्डींगच्या सोसायटीच सिक्युरीटी गार्ड हे तेथे आले. त्यावेळी बिपीनकुमार हा निघुन गेला.
तरुणीला के. ई. एम रुग्णालयात दाखल केले. उपचार करून बिपीन कुमार सिंग याच्या विरोधात पोलीस ठाणेस तक्रार देण्यात आली.