पैशांच्या वादातून केलेली मालकाची हत्या; फरार आरोपीस १९ वर्षांनी अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 07:17 AM2020-11-21T07:17:48+5:302020-11-21T07:18:03+5:30

डोंबिवलीतील सुखनिवास लॉज येथे राहणारे रेगो यांचे त्यांची देखभाल करणारा राजाराम शेट्टी याच्याबरोबर पैशांवरून भांडण झाले होते.

owner killed in a money dispute, arrested after 19 years | पैशांच्या वादातून केलेली मालकाची हत्या; फरार आरोपीस १९ वर्षांनी अटक

पैशांच्या वादातून केलेली मालकाची हत्या; फरार आरोपीस १९ वर्षांनी अटक

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पैशांच्या वादातून सिप्रेम जोसेफ रेगो (५३, रा. डोंबिवली) या आपल्याच मालकाचा खून करून तब्बल १९ वर्षे फरार असलेल्या राजाराम राजीव शेट्टी (६५) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने गुरुवारी अटक केली. त्याला रामनगर (डोंबिवली) पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.


डोंबिवलीतील सुखनिवास लॉज येथे राहणारे रेगो यांचे त्यांची देखभाल करणारा राजाराम शेट्टी याच्याबरोबर पैशांवरून भांडण झाले होते. हे भांडण विकोपाला गेल्यामुळे राजाराम याने रेगो यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून त्यांचा खून करून ८ मे २००१ रोजी पलायन केले होते. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी राजाराम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तो कर्नाटक राज्यातील कुद्र (जिल्हा-उडपी) येथील रहिवासी असल्यामुळे गावी, तसेच महाराष्ट्रातील नाशिकसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करीत होता. त्यामुळेच तो पोलिसांना मिळत नव्हता.

दरम्यान, तो ठाण्यातील विटावा ब्रिजजवळ येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक व पथकाने १९ नाेव्हेंबरला त्याला ताब्यात घेतले. या तपासासाठी मोहन भानुशाली यांचे विशेष सहकार्य मिळाले. राजाराम याच्याविरुद्ध सीआरपीसी २९९ नुसार दोषारोपपत्र दाखल केले आहे.

आयुक्तांकडून दखल
तब्बल १९ वर्षे पाठपुरावा करून आरोपीला कौशल्याने अटक केल्याने युनिट-१ च्या तपास पथकाचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: owner killed in a money dispute, arrested after 19 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.