पडघा पोलिसांची मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारवर धाड,  ८ जण अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 10:59 PM2019-06-17T22:59:36+5:302019-06-17T23:00:14+5:30

पडघा पोलिसांनी मीरारोड पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एका आॅर्केस्ट्रा बारवर धाड टाकली.

Padgha police arrests 8 people | पडघा पोलिसांची मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारवर धाड,  ८ जण अटकेत 

पडघा पोलिसांची मीरारोडच्या ऑर्केस्ट्रा बारवर धाड,  ८ जण अटकेत 

Next

मीरारोड - भिवंडी ग्रामीण पोलिसांनी गेल्या आठवड्यात मीरारोड व काशिमीरा येथील आॅर्केस्ट्रा बार वर धाडी टाकुन स्थानिक पोलिसांचे बारना असलेले संरक्षण उघडकीस आणुन देखील स्थानिक पोलीस व बार चालकांवर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. आता पडघा पोलिसांनी मीरारोड पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एका आॅर्केस्ट्रा बार वर धाड टाकुन तेथे बेकायदा अश्लील नृत्य करणाराया तब्बल ११ बारबालांना ताब्यात घेतले. तर बारच्या आठ कर्मचारायांना अटक केली.

पडघा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीष चौधरी यांना पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी मीरारोडच्या सिल्वर पार्क येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या एंजल पॅलेस आर्केस्ट्रा बार मध्ये मोठ्या संख्येने बेकायदा बारबाला अश्लिल नाचगाणे करत असल्याची माहिती देत कारवाईचे निर्देश दिले. उपनिरीक्षक चौधरींसह पडघा पोलीस ठाण्याचे भरत जगदाळे, सुभाष पादीर, मोहन भोईर, नरेश निमसे यांच्या पथकाने सापळा रचुन रात्री दहाच्या सुमारास बार मध्ये धाड टाकली.

बार मध्ये धाड टाकली असता आत मध्ये तब्बल ११ बारबाला होत्या. ९ बारबाला ह्या तोकड्या कपड्यां मध्ये अश्लील नृत्य करत होत्या. पोलीसांनी बारबालां सह उपस्थित ११ ग्राहकांचे नाव, पत्ते आदी नोंद करुन घेतले. तर बारचा व्यव्स्थापक शरद शेटट्टी सह ७ वेटर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. बार मधुन सापडलेली पावणे सतरा हजारांची रोख जप्त करण्यात आली आहे.

गेल्याच आठवडड्यात पडघा पोलीसांनी मीरारोडच्या बिंदीया तर भिवंडी तालुका पोलीसांनी काशिमीराच्या नाईट सीटी व बॉसी या आॅर्केस्ट्रा बार वर धाडी टाकुन मोठठ्या संख्येने बारबालांसह बार कर्मचारायांना ताब्यात घेतले होते. आता पुन्हा पडघा पोलीसांनी येऊन आणखी एंजल पॅलेस बार वर यशस्वी धाड टाक ली आहे. भिवंडी वरुन पोलीस येऊन कारवाई करत असल्याने स्थानिक पोलीसांचे बार चालकांशी असलेलं साटंलोटं पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Padgha police arrests 8 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.