पहलू खान मॉब लिंचिंगप्रकरणी सहा जणांची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 08:03 PM2019-08-14T20:03:55+5:302019-08-14T20:06:15+5:30
या प्रकरणी आज राजस्थान कोर्टाने सहा आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.
अल्वर- हरयाणात जनावरं घेऊन जात असताना गो तस्करीचा आरोपावरून हत्या करण्यात आलेला दूध डेअरीचा चालक पहलू खान यांच्या मृत्यूनंतर तब्बल दोन वर्षाने आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या प्रकरणी आज राजस्थान कोर्टाने सहा आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.
१ एप्रिल २०१७ रोजी अल्वर येथून हरयाणात जनावरं घेऊन जात असताना गो तस्करीचा आरोप करत एका टोळक्यानं पहलू खान यांच्यावर हल्ला केला होता. त्यात जबर जखमी झालेल्या पहलू खान यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. तत्पूर्वी, त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सहाजणांची नावं सांगितली होती. या आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी इनाम जाहीर करण्यात आलं होत. त्यानंतर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. याप्रकरणी ४० साक्षीदारांचा जबाब कोर्टात नोंदवून त्याची पडताळणी करण्यात आली. या खटल्याचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ७ ऑगस्ट रोजी पूर्ण झाला होता असून आज ६ आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली आहे. तर तीन अल्पवयीन आरोपींचा खटला ज्युव्हेनाईल कोर्टात सुरु आहे.
या तीन महत्वाच्या कारणांमुळे आरोपी निर्दोष सुटले
१. वायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओची तपासणी किंवा चौकशी योग्य प्रकारे झाली नाही
२. व्हिडीओ वायरल झालेल्या मोबाईल हस्तगत करण्यात आला नाही. तसेच कोर्टात सुनावणीवेळी व्हिडीओ सादर करण्यात आला नाही.
३. तसेच पहलू खानला ज्यावेळी मारहाण करण्यात आली. त्यावेळी पहलू खानच्या मुलाला देखील मारहाण झाली होती. तो आरोपींना ओळखू शकला नाही.
6 accused in the Pehlu Khan lynching case (2017) in Alwar have been acquitted by a Rajasthan court. pic.twitter.com/oGzsFY64Ri
— ANI (@ANI) August 14, 2019
राजस्थान - मॉब लिंचिंग प्रकरण : सहा आरोपींची राजस्थान कोर्टाकडून निर्दोष सुटका https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) August 14, 2019