मेहबूब शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर बॅग भरुन पैसे दिले; पीडित तरुणीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 01:37 PM2022-06-19T13:37:32+5:302022-06-19T13:38:17+5:30
भाजपाच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील आरोप प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने थेट घुमजाव केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण इथे थांबलेलं नाही, तर या प्रकरणी आरोप करणाऱ्या तरुणीने भाजपाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्याविरोधात आता तक्रार करण्यात आली आहे.
भाजपाच्याचित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर नदमोद्दीन याने बीडमध्ये सुरेश धस, चित्रा वाघ आणि जिया बेग नावाच्या व्यक्तीसोबत भेट घालून दिली. त्यांनतर बेग याने पोलिसांनी त्रास देऊ नयेत आणि मुंबईत राहण्याची व्यवस्था करण्यासाठी 'बॅग' मध्ये पैसे दिले असल्याची माहिती तरुणीने दिली आहे. याप्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नदमोद्दीन शेख आणि विशाल खिलारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे. 'राष्ट्रवादीच्या मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला मला मदत करा असं आमच्याकडे सांगत आलेल्या पीडितेने घुमजाव करत गुन्हा दाखल करण्यास आम्हीचं भाग पाडलं म्हणत तक्रार केली आहे, हे आताचं माध्यमातून कळल ज्या केसेसमध्ये राजकीय धेंड असतात तिथे असं होणं अगदी स्वाभाविक सगळ्या चौकशींना मी तयार आहे. आम्ही त्या मुलीला मदत केली आहे. आम्ही चौकशीला जायला तयार आहे. असे अनुभव येत असतात तरीही आम्ही घाबरणार नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
NCP चा मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला मला मदत करा असं आमच्याकडे सांगत आलेल्या पिडीतेने घुमजाव करत गुन्हा दाखल करण्यास आम्हीचं भाग पाडलं म्हणत तक्रार केलीये हे आताचं माध्यमातून कळलयं
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 18, 2022
ज्या केसेस मध्ये राजकीय धेंड असतात तिथे असं होणं अगदी स्वाभाविक
सगळ्या चौकशींना मी तयार आहे pic.twitter.com/SqQgpcVrcY
दरम्यान, फिर्यांदी महिलेने १४ नोव्हेंबर २०२० रोजी शहरातील रामगिरी हाॅटेल जवळील एका महाविद्यालया जवळच्या निर्मनुष्य जागेवर कारमध्ये आपल्यावर मेहबूब इब्राहीम याने अत्याचार केल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले होते. यावरून सिडको पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. मेहबुब शेख यांनी नोकरीचे आमिष दाखवून गाडीत अत्याचार केल्याचा आरोप त्या तरुणीने केला होता. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले होते. ही तक्रार काही महिन्यापूर्वी केली होती.