वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 05:36 PM2020-07-20T17:36:29+5:302020-07-20T17:38:48+5:30

उपचारादरम्यान जखमी सांडणीचा मृत्यू झाला. या घटनेबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. यापूर्वी केरळमधील गरोदर हत्तीणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Painful! As the camel entered the farming field, it cut off its leg with an axe and died | वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

googlenewsNext
ठळक मुद्देया वेदनादायक घटनेची माहिती गावात आगीसारखी पसरली. याबाबत ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सांडणीला उपचारासाठी पाठवले.या गावातले मेघवाल, गोपीराम आणि लिच्छूराम मेघवाल यांनी सांडणीच्या पुढच्या पायांवर कुऱ्हाडीने वार करून सांडणीस जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे.

राजस्थानमधील चुरू येथून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी काही लोकांनी कुऱ्हाडीने सांडणीचा पाय कापला. उपचारादरम्यान जखमी सांडणीचा मृत्यू झाला. या घटनेबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. यापूर्वी केरळमधील गरोदर हत्तीणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती.


या वेदनादायक घटनेची माहिती गावात आगीसारखी पसरली. याबाबत ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सांडणीला उपचारासाठी पाठवले. मात्र, तो वाचू शकला नाही. सांडणीवर केलेल्या क्रूर अत्याचाराबाबत लोक सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करीत आहेत. दोषींवर कठोर शिक्षा होण्याची मागणी केली जात आहे.

ही घटना चूरूच्या साजनसर गावची आहे. या गावातले मेघवाल, गोपीराम आणि लिच्छूराम मेघवाल यांनी सांडणीच्या पुढच्या पायांवर कुऱ्हाडीने वार करून सांडणीस जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे. कारण सांडणीने त्यांचे शेत खराब केले होते. तेथे उपस्थित काही लोकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्नही केला.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि मेडिकल बोर्डाकडून सांडणीची मेडिकल करण्यात आली. तथापि, जास्त रक्तस्त्रावामुळे आणि वेदनांनी सांडणीने जीव सोडला. याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. सरदारशाह पोलीस स्टेशनचे एसएचओ महेंद्र शर्मा यांनी सांगितले की, कोणीतरी सांडणीचे पाय कापले होते. आम्हाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच सांडणीला रुग्णालयात उपचारासाठी आला. परंतु उपचारादरम्यान अत्यधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात सर्व दोषींना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

Web Title: Painful! As the camel entered the farming field, it cut off its leg with an axe and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.