पाक महिलेच्या मोहात अडकला; लष्कराची माहिती लीक करणाऱ्या जवान गेला पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 10:09 PM2021-11-15T22:09:33+5:302021-11-15T22:11:24+5:30

HoneyTrap Case : गणेश कुमार असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव असून तो सध्या पुण्यात तैनात होता. नुकतीच त्यांची जोधपूरहून पुण्यात बदली झाली.

Pak tempted by a woman; Caught leaking army information | पाक महिलेच्या मोहात अडकला; लष्कराची माहिती लीक करणाऱ्या जवान गेला पकडला

पाक महिलेच्या मोहात अडकला; लष्कराची माहिती लीक करणाऱ्या जवान गेला पकडला

Next

लष्करात पुन्हा एकदा हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती एका पाकिस्तानी तरुणीला जवान देत होता. दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) याची माहिती मिळताच आरोपी जवानाला अटक करण्यात आली.

आरोपी जवान बिहारचा रहिवासी असून तो रजेवर घरी गेला होता, तेव्हाच त्याला एटीएसने अटक केली. आरोपी जवानाने चौकशीदरम्यान पाकिस्तानी महिलेसोबत माहिती शेअर केल्याची कबुलीही दिली आहे. गणेश कुमार असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव असून तो सध्या पुण्यात तैनात होता. नुकतीच त्यांची जोधपूरहून पुण्यात बदली झाली. गणेशवर भारतीय लष्कराशी संबंधित कागदपत्रे एका पाकिस्तानी महिलेसोबत शेअर केल्याचा आरोप आहे.

फेसबुकवर मैत्री

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश फेसबुकच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आला. हळूहळू दोघेही बोलू लागले आणि त्यांच्यात मैत्री झाली. दोघेही फोन नंबरवरून एकमेकांशी बोलत असत. महिलेने जवानाला अशा पद्धतीने गोवले की गणेशने लष्कराशी संबंधित कागदपत्रे त्या महिलेसोबत शेअर करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी महिलेने स्वत:ला भारतीय संरक्षणाची डॉक्टर असल्याचे सांगितले होते.


आरोपी जवान असा पकडला गेला

काही जवान भारतीय लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी एजंटला लीक करत असल्याचा संशय अनेक दिवसांपासून गुप्तचरांना होता. यानंतर गुप्तचरांनी तपास सुरू केला असता गणेशकडे संशयाची सुई येऊन थांबली. गणेश सुट्टीवर घरी गेला होता, तेथून त्याला एटीएसच्या पथकाने अटक केली.

गणेशला पाटणा येथील खगौल पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले. चौकशीदरम्यान गणेशने पाकिस्तानी महिलेसोबत माहिती शेअर केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याच्यावर प्रायव्हसी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मात्र, याप्रकरणी लष्कराचे अधिकारी अधिकृतपणे माहिती देण्यास टाळत आहेत.

यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत

लष्कराचा जवान पाकिस्तानी एजंटच्या जाळ्यात अडकून महत्त्वाची माहिती शेअर करण्याची ही पहिलीच घटना नाही. या अगोदरही एका पाकिस्तानी महिलेने दानापूर उपक्षेत्रात संतोष नावाच्या सैनिकाला सापळा रचून लष्कराशी संबंधित कागदपत्रे मिळवली होती. त्यातही जवानाला अटक करण्यात आली होती.

Web Title: Pak tempted by a woman; Caught leaking army information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.