धक्कादायक! 20 वर्षीय टिकटॉक स्टारची आत्महत्या; मुलीने लग्नास नकार दिल्याने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:38 PM2021-03-13T13:38:02+5:302021-03-13T13:44:14+5:30
Tiktok Star Suicide : एका लोकप्रिय टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पेशावर - तरुणाईमध्ये टिकटॉकची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. अल्पावधीत अनेकांना टिकटॉकने स्टार केलं आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लोकप्रिय टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहजाद अहमद असं या 20 वर्षीय टिकटॉक स्टारचं नाव असून पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ही भयंकर घटना घडली. शहजादने आपली फॅन असलेल्या एका मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, तिने नकार दिल्यावर त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून आयुष्य संपवलं आहे.
द एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, शहजाद टिकटॉकवर अत्यंत लोकप्रिय होता. त्याचे टिकटॉकवर तब्बल दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. याआधीदेखील त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्याला वाचवण्यात यश आले होते. शहजादचा भाऊ सज्जातने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शहजादचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, तिच्या वडिलांनी त्याच्या लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे शहजादला मोठा धक्का बसला होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या भावाने दिली आहे.
शहजादच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी एका मुलीने फॅन असल्याचं सांगत शहजादसोबत संपर्क साधला होता. कालांतराने दोघांमध्ये पुढे मैत्री झाली. मुलगी अल्पवयीन आहे. तिचे वय 16 वर्ष असून ती शालेय शिक्षण घेत आहे. शहजादने मुलीला प्रेमाची मागणीदेखील घातली होती. मात्र, मुलीने नकार दिला आणि यापुढे संपर्क न साधण्याची विनंती केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ओडिशात खळबळ! विधानसभेत आमदाराने असं कृत्य करण्यामागे "हे" आहे नेमकं कारण?https://t.co/HoqGF3OsNL#OdishaAssembly#Odisha#BJP#SubhashChandraPanigrahi#Suicide
— Lokmat (@MiLOKMAT) March 13, 2021
विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! भाजपा आमदाराने सॅनिटायझर पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न
ओडिशा विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. भाजपाच्या एका आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभेत घडलेल्या या धक्कादायक घटनेने गोंधळ उडाला. सुभाष चंद्र पाणिग्रही (Subhash Chandra Panigrahi) असं या भाजपा आमदाराचं नाव असून ते देवगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. अन्न आणि पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री रणेंद्र प्रताप स्वैन हे विधानसभेत धान्य खरेदीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असतानाच हा हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
भाजपा आमदार सुभाष चंद्र पाणिग्रही यांनी सॅनिटायझर पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा संसदीय कामकाज मंत्री बिक्रम केशरी अरुखा आणि इतर आमदारांनी त्यांना रोखलं. तसेच त्यांच्या हातातून सॅनिटायझर हिसकावून घेतलं. पाणिग्रही यांनी "सरकार टोकन सिस्टम आणि बाजार समित्यांमधील चुकीच्या व्यवस्थापनासारखे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरलंय. शेतकरी धान्य खरेदीबाबत कायमच चिंताग्रस्त राहिला आहे. मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही" असा गंभीर आरोप केला आहे.
भयंकर! चालत्या कारमधील बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, घटनेने खळबळhttps://t.co/2gLl3ip0HL#Crime#Police
— Lokmat (@MiLOKMAT) March 9, 2021